नवी मुंबई विमानतळ नामकरण; शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा मंत्रिमंडळात होणार ठराव - Naming of Navi Mumbai Airport; The name of Shivsena chief will be decided in the cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

नवी मुंबई विमानतळ नामकरण; शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा मंत्रिमंडळात होणार ठराव

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 जून 2021

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाबद्दल तडजोडीची शक्यताच नसल्याचे ज्येष्ठ मंत्र्यांनी नमूद केले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा निर्णय झाला असल्याचे जाहीर केले आहे. नवी मुंबई विमानतळाची मालकी आता अदानी समुहाकडे आली असून विमानतळाचे प्रारुप तयार झाले आहे.

मुंबई : नवी मुंबई विमानतळाला New Mumbai Airport शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांचे नाव देण्याचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार गेले काही दिवस याविषयी आंदोलकांशी सुरु असलेली चर्चा सामोपचाराने संपू शकत नसल्याचे लक्षात आल्याने आता हा निर्णय घेवून टाकू, असे शिवसेनेचे मत झाले आहे. Naming of Navi Mumbai Airport; The name of Shivsena chief will be decided in the cabinet

नवी मुंबई परिसरात मोर्चेबांधणी करण्यासाठी या जनआंदोलनाला भाजप आडून हवा देत असल्याचा शिवसेनेचा ग्रह झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे. त्या आशयाचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणण्याची तयारी सेनेने केली आहे. 

हेही वाचा :  राज्य सरकारचे संभाजीराजेंना चर्चेसाठी निमंत्रण

महाविकास आघाडी सरकारमधील अन्य सहकारी पक्षांशी बातचीत करून हा प्रस्ताव येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाण्याची दाट शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाबद्दल तडजोडीची शक्यताच नसल्याचे ज्येष्ठ मंत्र्यांनी नमूद केले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा निर्णय झाला असल्याचे जाहीर केले आहे. नवी मुंबई विमानतळाची मालकी आता अदानी समुहाकडे आली असून विमानतळाचे प्रारुप तयार झाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख