पैशाच्या पावसामुळे कोरेगावात माझा पराभव; समोर कोणी असो सातारा-जावळीसह राज्यभर फिरणार   

आपण केलेला बदल चुकलेला आहे, हे या मतदारसंघातील लोकांना लवकरच पटेल, असे नमूद करून आमदार शिंदे म्हणाले, "विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या ठिकाणी दुसरा कोणी असता, तर ५०-६० हजारांचा फरक पडला असता. मी लोकांमधला असल्याने काठावर नापास झालो. मात्र, निवडणुकीनंतर मी लगेचच कार्यरत झालो.
My defeat in Koregaon by the rain of money says MLC Shashikant Shinde
My defeat in Koregaon by the rain of money says MLC Shashikant Shinde

कोरेगाव : 'काही मंडळी विधीमंडळात येऊ नयेत याचे नियोजनच भाजपच्या लोकांनी केले होते, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील सभेने राष्ट्रवादीला विजय मिळवून दिला. मात्र, त्यानंतर कोरेगाव  मतदारसंघात झालेल्या पैशांच्या पावसाने माझा पराभव केला. माझा पराभव जनतेतून नव्हे, तर राज्य पातळीपासून अनेकांनी केला. तरीही राष्ट्रवादीचा निष्ठावंत म्हणून मी विधानपरिषदेवर गेलोच. आता समोर कोणीही असो. राष्ट्रवादीचा विचार माणसांत पेटवण्याचे काम करणार', अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे यांनी विरोधकांना पुन्हा ठणकावले. 

एकंबे (ता. कोरेगाव) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी सभापती राजाभाऊ जगदाळे, शिवाजीराव महाडिक, तानाजीराव मदने, भगवानराव जाधव, अरुण माने, भास्कर कदम, श्रीमंत झांजुर्णे, सुप्रिया सावंत, शहाजीराव बर्गे, रमेश उबाळे, संजय पिसाळ, श्रीमंत झांजुर्णे, डॉ. गणेश होळ, प्रताप कुमुकले, अजित बर्गे, अॅड. पांडुरंग भोसले, गोरख चव्हाण, पी. के. चव्हाण, विजयराव चव्हाण, सरपंच शोभा कर्णे, उपसरपंच अशोक चव्हाण उपस्थित होते.

आपण केलेला बदल चुकलेला आहे, हे या मतदारसंघातील लोकांना लवकरच पटेल, असे नमूद करून आमदार शिंदे म्हणाले, "विधानसभेच्या निवडणुकीत
माझ्या ठिकाणी दुसरा कोणी असता, तर ५०-६० हजारांचा फरक पडला असता. मी लोकांमधला असल्याने काठावर नापास झालो. मात्र, निवडणुकीनंतर मी लगेचच कार्यरत झालो.

विद्यमान आमदारांच्या निवडणुकीनंतर किती सभा झाल्या, ते माहित नाही. सत्ता मिळाल्यावर माणसाने जमिनीवर राहावे, डोक्यात हवा गेली, की माणूस संपतो. 'आधे इधर, आधे उधर', कामाच्या वेळेला शिवसेना, बाकीच्या वेळेला भाजप, अशी परिस्थिती आहे. आम्ही कधी अशी दुहेरी भूमिका घेतली नाही. आमच्या पोस्टरवर आमच्या पक्षाचे चिन्ह असते. त्यांच्या पोस्टरवर त्यांच्या पक्षाचे चिन्ह असते का, हे स्पष्ट झाले पाहिजे. 

मी तुमच्यामध्ये आहे आणि शेवटपर्यंत तुमच्यामध्येच राहिन.  विकासकामांसाठी इंचभरही कमी पडणार नाही. जास्त काम करणाऱ्याच्या पाठिशी राहा, कामाची स्पर्धा लावा, दुसऱ्या कोणत्या गोष्टीची स्पर्धा लावली, तर मात्र मी कमी पडेन." सभापती जगदाळे, शिवाजीराव महाडिक, रमेश उबाळे, व्ही. टी. चव्हाण, सतीश कर्णे यांची भाषणे झाली.

लोकनियुक्त की नोटनियुक्त...

विद्यमान आमदार लोकनियुक्त आहेत की नोटनियुक्त? असा प्रश्न उपस्थित करून रमेश उबाळे म्हणाले, "ते फक्त गाजरे दाखवून आश्वासने देऊ शकतात. विकासकामे केवळ शशिकांत शिंदे हेच करू शकतात, याचा अनुभव सध्या मी घेत आहे आणि त्यामुळेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचा मला सार्थ अभिमान आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com