...हा तर मराठा आरक्षणाचा खून : राजेंद्र कोंढरे - ... This is the murder of Maratha reservation says Rajendra Kondhare | Politics Marathi News - Sarkarnama

...हा तर मराठा आरक्षणाचा खून : राजेंद्र कोंढरे

अमोल कविटकर
बुधवार, 23 डिसेंबर 2020

आम्ही 'सुपर न्युमररी'चा पर्याय राज्य सरकारला दिला होता. आम्ही या आरक्षणासाठी २५ वर्षांची तपश्चर्या केली आहे. त्यामुळे मी ठामपणे सांगू शकतो, ही राज्य सरकारने केलेली फसवणूक आहे. जर २५ जानेवारीला सुनावणी होती तर सरकार थांबू शकत नव्हते का?

पुणे : केंद्र सरकारच्या आर्थिक निकषावरील असलेले आरक्षण मराठा समाजाला ईडब्लूएस अंतर्गत आरक्षण देण्याचा हा निर्णय म्हणजे मराठा आरक्षण विषयाचा खून असून राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले आहे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी मांडली आहे.

मराठा समाजाला ईडब्लूएस अंतर्गत आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर कोंढरे 'सरकारनामा'शी बोलत होते. मराठा समाजाला आधीच ईडब्लूएस अंतर्गत आरक्षण असताना हा समावेश असंविधानिक आहे, असा दावाही कोंढरे यांनी केला आहे

आर्थिकनिकषाचे आरक्षण मराठा समाजाला देणे हा मराठा आरक्षणाचा खून असल्याचे सांगून कोंढरे पुढे म्हणाले, 'राज्य सरकारचे मराठा आरक्षण
एससीबीसी आणि केंद्र सरकारचे ईडब्लूएस आरक्षण या दोन्ही आरक्षणाचे 'स्टेटस' वेगळे असून आम्ही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहोत. मराठा समाजाचा समावेश ईडब्लूएसमध्ये व्हावा, यासाठी काही ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारवर दबाव टाकला आणि यासाठी 'लॉबिंग' केले असून यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे'. 

आम्ही 'सुपर न्युमररी'चा पर्याय राज्य सरकारला दिला होता. आम्ही या आरक्षणासाठी २५ वर्षांची तपश्चर्या केली आहे. त्यामुळे मी ठामपणे सांगू शकतो, ही राज्य सरकारने केलेली फसवणूक आहे. जर २५ जानेवारीला सुनावणी होती तर सरकार थांबू शकत नव्हते का? जर ओबीसी आरक्षणाला धक्का लावू न देण्याची चारही राजकीय पक्षांची भूमिका असेल तर चारही पक्षांनी मराठा उमेदवारांना ओबीसीकोट्यातून उमेदवारी देऊ नये, असेही कोंढरे म्हणाले.

 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख