नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांचा खून, आरोपीचीही आत्महत्या - Murder of five members of the same family in Nagpur, accused also commits suicide | Politics Marathi News - Sarkarnama

नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांचा खून, आरोपीचीही आत्महत्या

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 21 जून 2021

सर्वांना मारल्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या केली. दरम्यान, सकाळी उठल्यानंतर शेजाऱ्यांना कोणीही घराबाहेर दिसले नाही. त्यामुळे त्यांनी घरात जाऊन बघितले असता सहा मृतदेह आढळून आले.

नागपूर : येथील तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा खून करून आरोपीने केली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. Murder of five members of the same family in Nagpur, accused also commits suicide

प्राथमिक माहितीनुसार, अमरावतीमधील एक कुटुंब उदरनिर्वाहासाठी या परिसरात राहायला आले होते. त्याच घरातील मुलाने कुटुंबातील पाच जणांची हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याची माहिती आहे. या प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचीही माहितीही सूत्रांनी दिली आहे. चिमाबाई पेठ, पाचपावली फाटकाजवळ ही घटना घडली. अलोक माथूरकर (४८) असे आरोपीचे नाव आहे. तो गेल्या आठ महिन्यापूर्वी अमरावतीवरून नागपुरात राहायला आला होता. 

हेही वाचा : संभाजीराजेंनी मांडल्या मराठा समाजाच्या `या` मागण्या

चिमाबाई पेठ येथे भिसीकर यांच्या घरी किरायाने राहत होता.  तो टेलरिंगचं काम करत होता. त्याच्याच घरी सासू लक्ष्मी बोबडे आणि मेव्हणी अमिषा बोबडे देखील राहत होत्या. मेव्हणी अमिषाचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर त्याने सासूला विचारणा केली. यावरून सासू आणि अलोकमध्ये वाद झाला. त्यानंतर त्याने मेव्हणीच्या बेडरुममध्ये जाऊन तिला मारले. त्यानंतर मुलगी परी (१४)आणि मुलगा साहिल (१२) या दोन्ही मुलांच्या जेवणात विष घातले. त्यामुळे मुलांचा देखील मृत्यू झाला. 

आवश्य वाचा : जगातील लोक साईबाबांना साकडे घालतात अन इथले लोक अध्यक्षपदासाठी वरिष्ठ नेत्यांना

त्यानंतर बायको विजया (४५)आणि सासू लक्ष्मीचा देखील खून केला. सर्वांना मारल्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या केली. दरम्यान, सकाळी उठल्यानंतर शेजाऱ्यांना कोणीही घराबाहेर दिसले नाही. त्यामुळे त्यांनी घरात जाऊन बघितले असता सहा मृतदेह आढळून आले. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख