लॉकडाऊनच्या विरोधात उदयनराजेंचे 'भीक मांगो'; शास्त्रज्ञ सांगत नाहीत तोपर्यंत नो लॉकडाऊन - MP Udayanraje's 'Bhik Mango' against lockdown; No lockdown unless scientists say so | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

लॉकडाऊनच्या विरोधात उदयनराजेंचे 'भीक मांगो'; शास्त्रज्ञ सांगत नाहीत तोपर्यंत नो लॉकडाऊन

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात कोणीच नव्हते. त्यामुळे त्यांन आहे का कोणी... आमचे ऐकायला.. असे ओरडून विचारले. यावेळी पोलिस निरिक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात कोणीही नाही, असे सांगितले. मग उदयनराजेंनी त्यांना हे पैसे तुम्ही स्वीकारा व शासनाला द्या. म्हणजे ते यातून कोरोनाची उपाय योजना करतील, असे सांगितले.

सातारा : लॉकडाऊनच्या निषेधार्थ साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवई नाका येथे पोत्यावर बसून 'भीक मांगो' आंदोलन केले. यावेळी पोवई नाक्यावरून ते चालत जिल्हाधिकारी कार्यालयात हातात ताट घेऊन गेले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात कोणीही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे त्यांनी कोणी आहे का... आमचे ऐकायला.. असे ओरडून विचारले. पोलिसांनी जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर तहसिलदार बाहेर आले. उद्यनराजेंनी जमा झालेली चारशे रूपयांची रक्कम तहसिलदारांकडे सुपूर्द केली. जोपर्यंत शास्त्रज्ञ सांगत नाहीत तोपर्यंत नो लॉकडाऊन, उदयापासून सगळे सुरू होणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

शासनाच्या मिनी लॉकडाऊनच्या विरोधात उदयनराजेंनी पहिल्यापासून भूमिका घेतली आहे. आज (शनिवार) पासून दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन सुरू झाले. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी सातारा शहरात मोठा बंदोबस्त लावला होता. दरम्यान, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे दुपारी एक वाजता पोवईनाका येथे आपल्या गाडीतून आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले व तेथीलच एका आंब्याच्या झाडाखाली पोते अंधरून बसले.

.त्यांनी आता ताट घेतलेले होते. उदयनराजेंनी अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे पोलिसही अस्वस्थ झाले होते. थोडावेळ बसल्यानंतर त्यांनी हातात ताट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चालत निघाले. यावेळी जाताना त्यांनी शासन व जिल्हा प्रशासनावर कडाडून टीका केली. जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचताच त्यांनी ताटात जमा झालेली भिक मोजण्यास सांगितली. चारशे रूपये भरले. ही भिक घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणालातरी बोलवा असे त्यांनी सांगितले.

मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात कोणीच नव्हते. त्यामुळे त्यांन आहे का कोणी... आमचे ऐकायला.. असे ओरडून विचारले. यावेळी पोलिस निरिक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात कोणीही नाही, असे सांगितले. मग उदयनराजेंनी त्यांना हे पैसे तुम्ही स्वीकारा व शासनाला द्या. म्हणजे ते यातून कोरोनाची उपाय योजना करतील, असे सांगितले.

मात्र, श्री. मांजरे यांनी नकार दिला. त्यानंतर उदयनराजे अधिकच आक्रमक झाल्याने श्री. मांजरे यांनी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क केला. त्यानंतर एक तहसिलदार तातडीने दाखल झाला. त्याच्याकडे जमा झालेले पैसे देऊन उदयनराजेंनी त्यांना जोपर्यंत शास्त्रज्ञ सांगत नाहीत तोपर्यंत नो लॉकडाऊन. उद्यापासून सर्व काही उघडले जाईल, तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगा, असे ठणकावून उदयनराजे निघून गेले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख