उदयनराजेंनी कृष्णकुंजवर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट

दोन्ही नेत्यांनी मराठा आरक्षण, तसेच राज्यातील राजकिय परिस्थितीवर तासभर चर्चा केली. उदयनराजे प्रथमच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांत महाराष्ट्रातील राजकिय विषयावर चर्चा झाली आहे.
MP Udayanraje visited Krishnakunj and met Raj Thackeray
MP Udayanraje visited Krishnakunj and met Raj Thackeray

सातारा : भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सायंकाळी कृष्णकुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी श्री. ठाकरे यांना राजमुद्रा भेट दिली. तसेच त्यांच्या मामाच्या मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिकाही त्यांनी दिली. यावेळी मराठा आरक्षण व राज्यातील राजकिय परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी तासभर चर्चा केली. या भेटीमुळे राजकिय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे.  

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनासपासून साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिग्गज नेत्यांना भेटण्याचा व त्यांना राजमुद्रा भेट देण्याचा सपाटा लावला आहे. आज त्यांनी मुंबईत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत त्यांनी राज ठाकरे यांचे राजमुद्रा भेट दिली. तसेच त्यांच्या मामाच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देऊन लग्नास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.

त्यानंतर राज ठाकरे यांनीही उदयनराजेंच शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उदयनराजेंसमवेत जितेंद्र खानविलकर, काकासाहेब धुमाळ उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी मराठा आरक्षण, तसेच राज्यातील राजकिय परिस्थितीवर तासभर चर्चा केली. उदयनराजे प्रथमच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांत महाराष्ट्रातील राजकिय विषयावर चर्चा झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com