उदयनराजे म्हणतात, निवडणुकीवर खर्च करण्यापेक्षा बिनविरोध करा....

साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज अचानक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेआधी बँकेच्या मुख्य कार्यालयात उपस्थिती लावली.
उदयनराजे म्हणतात, निवडणुकीवर खर्च करण्यापेक्षा बिनविरोध करा....
MP Udayanraje says, instead of spending on elections, do it without any objection ....

सातारा : निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा निवडणुकीचा पैसा शेतकरी सभासदांसाठी वापरला तर त्यांना चांगला फायदा होईल, अशी अपेक्षा जिल्हा बँकेचे संचालक व खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. दरम्यान, बँक व्यवस्थित चाललेली असताना बँकेला 'ईडी' नोटीस का पाठविण्यात आली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. MP Udayanraje says, instead of spending on elections, do it without any objection ...

साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज अचानक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेआधी बँकेच्या मुख्य कार्यालयात
उपस्थिती लावली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागली असून त्या अनुषंगाने त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी बँकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. तसेच बँकची निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीशी माझा काही संबंध नाही. पण, बँकेची निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा
निवडणुकीचा पैसे सभासदांसाठी वापरला तर सभासदांचा फायदा होईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. तसेच बँक व्यवस्थित चालली असताना बँकेला 'ईडी' ची नोटीस का पाठविण्यात आली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in