शिवाजीमहाराज, संभाजीराजेंच्या भूमिकांमुळे कांताबाई कायम स्मरणात राहतील... - MP Udayanraje paid tribute to Kantabai satarkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

शिवाजीमहाराज, संभाजीराजेंच्या भूमिकांमुळे कांताबाई कायम स्मरणात राहतील...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 26 मे 2021

कांताबाई सातारकर यांच्या निधनाने तमाशातील एका युगाचा अस्त झाला, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी कांताबाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सातारा : एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी (Kantabai Satarkar) तमाशा क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. मराठी रंगभूमीवर स्त्रीने पुरुषांची भूमिका केल्याची उदाहरणे फार कमी आहेत. कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या भूमिका हुबेहूब वठवल्या. त्यांची पुरुष कलाकारांनाही त्या भूमिकांची नक्कल करावी असे वाटायचे. यांच्या निधनाने तमाशातील एका युगाचा अस्त झाला, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी कांताबाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. MP Udayanraje paid tribute to Kantabai satarkar

आपल्या अदाकारीने तमाशा जिवंत करणाऱ्या तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे मंगळवारी (ता. २५) निधन झाले. साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कांताबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून सोशल मीडियावरून त्यांना श्रध्दांजली वाहिली. उदयनराजेंनी म्हटले की, एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. 

हेही वाचा : यास धडकले; ओडिशा, बंगाल किनारपट्टीवर जलप्रलय...अनेक गावे पाण्याखाली

2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला होता. मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे फार कमी पाहायला मिळतील.

आवश्य वाचा :  उजणीचा पाणी प्रश्न पेटला; पवारांच्या निवासस्थानासमोर सुरक्षा वाढवली

कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवल्या की पुरुष कलाकारांनाही त्या भूमिकांची नक्कल करावी वाटायचे, असा त्यांचा लौकीक होता. त्यांच्या कुटुंबीयांच्या व परिजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. कांताबाई सातारकर यांच्या निधनाने तमाशातील एका युगाचा अस्त झाला, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी कांताबाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख