रेल्वेचे मोठे प्रकल्प साताऱ्यात येणार; उदयनराजेंची मंत्री पियुष गोयलांशी चर्चा

पर्यटनदृष्ट्या महत्वाचे असलेले सातारा रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण आणि सौंदर्यीकरण तात्काळ करावे. जेणेकरून जिल्ह्यातील पर्यटनासाठी पर्यटक आकर्षित होतील. सातारा जिल्ह्यातील महागांव येथे रेल्वेची ५० एकर मोकळी जमीन उपलब्ध आहे. या जमिनीवर रेल्वेचा स्वत:चा सौरउर्जा प्रकल्प उभा करावा.
MP Udayanraje met Minister Piyush Goyal on railway issues
MP Udayanraje met Minister Piyush Goyal on railway issues

सातारा : पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे रेल्वेचे विविध प्रकल्प साताऱ्यात आणण्यासोबतच जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध  मागण्यांबाबत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन चर्चा केली. साताऱ्यात रेल्वेचा सौरउर्जा प्रकल्प उभारावा तसेच सातारा रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण करावे, आदी मागण्या त्यांनी निवेदनाव्दारे केल्या. यावर मंत्री गोयल यांनी साताऱ्यासाठी रेल्वेचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. 

जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रकल्प व प्रलंबित कामांना चालना मिळावी, यासाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची दिल्लीत भेट घेतली. तसेच त्यांनी विविध विषयांवर महत्वपूर्ण चर्चा केली. पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे रेल्वेचे विविध प्रकल्प साताऱ्यात आणण्याबाबतचे निवेदन उदयनराजेंनी यावेळी दिले. रेल्वेच्या विविध प्रश्नावर श्री. गोयल यांच्याशी सविस्तर चर्चा केली. 

या मध्ये प्रशासकिय मंजूरी मिळालेला सुमारे ३००० कोटी रूपये खर्चाच्या कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे.  पर्यटनदृष्ट्या महत्वाचे असलेले सातारा रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण आणि सौंदर्यीकरण तात्काळ करावे. जेणेकरून जिल्ह्यातील पर्यटनासाठी पर्यटक आकर्षित होतील. सातारा जिल्ह्यातील महागांव येथे रेल्वेची ५० एकर मोकळी जमीन उपलब्ध आहे. या जमिनीवर रेल्वेचा स्वत:चा सौरउर्जा प्रकल्प उभा करावा.

जेणेकरून निर्माण झालेली वीज रेल्वेसाठी वापरात येईल, अशी सूचना उदयनराजेंनी मांडली. या महत्वाच्या मागणींसह रेल्वेचे विविध प्रकल्प जिल्ह्यात आणण्याबाबत श्री. गोयल यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी गोयल यांनी साताऱ्यासाठी जास्तीत जास्त रेल्वेचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com