मेडिकल कॉलेजचेही उद्‌घाटन करणार, कोण आडवं आलं तर आडवं करणार...

ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करण्यासाठी राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यांना बोलावे होते. पण कोरोनामुळे कुणीच यायला तयार नव्हते आणि 'असं कुठं कायद्यात म्हटलं आहे का, मंत्री असेल तरच उद्घाटन करायचे. मीसुद्धा खासदार आहे आणि असा तसा नाही भरपूर खाज असलेला खासदार असल्याचेही त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले.
MP Udayanraje fired a cannon at the district administration.
MP Udayanraje fired a cannon at the district administration.

सातारा : ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाच्या चर्चेचा चिमटा काढत उदयनराजेंनी, बाकीचे रथी-महारथी ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाला आले असते तर भाषणं झाली असती आणि न पाहताच सांगितलं असतं योगदान किती ते? मी मात्र 'अभी के अभीच' म्हणत उद्घाटन केल्याचे वक्तव्य केले. आता कोणीही काही करू द्या उद्घाटन झालेलं आहे. जसं ग्रेड सेपरेटरचं उद्घाटन झालं तशी वेळ आली तर मेडिकल कॉलेजचं पण उद्घाटन करणार, कोण आडवं आलं तर आडवं करणार, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी साताऱ्यतील पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केले होते. त्यावरून बराच वाद पेटला होता. त्यानंतर आज पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजे यांनी जिल्हा प्रशासनावर चौफेर तोफ डागली. 'राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारच्या काळात साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजसह अनेक काम श्रेयवादामुळे रखडले असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी  केला आहे.

फडणवीस सरकारच्या काळात मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली आणि चालना मिळाली. ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करण्यासाठी राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यांना बोलावे होते. पण कोरोनामुळे कुणीच यायला तयार नव्हते आणि 'असं कुठं कायद्यात म्हटलं आहे का, मंत्री असेल तरच उद्घाटन करायचे. मीसुद्धा खासदार आहे आणि असा तसा नाही भरपूर खाज असलेला खासदार असल्याचेही त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले.

त्यामुळे उदयनराजेंच्या चौफर फटकेबाजीचा प्रभाव जिल्हा शासनावर कितपत होणार हे लवकरच कळणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी आदेश काढत ग्रेड सेपरेटरचे शासकीय उद्घाटन केले जाणार असल्याचे आदेश काढले होते. यावरती उदयनराजेंनी आज जोरदार टीका करत प्रशासनाचा चांगलाच समाचार घेतला.
 

शरद पवार, पृथ्वीराज चव्हाणांवर टीका....

शरद पवारांना विनंती करून देखील कोणतेही लोकप्रतिनिधी ग्रेड सेपरेटरच्या भूमिपूजनावेळी आपल्या संकुचित विचार आणि   नाकर्त्यापणामुळे आले नाही म्हणून उद्घाटन उरकले, असंही उदयनराजेंनी ठणकावून सांगितले. दरम्यान, उदयनराजेंनी माजी मुख्यमंत्र्यावर देखील तोफ डोगली. ते म्हणाले, राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सरकार होतं. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी श्रेय वादामुळे मेडिकल कॉलेज रखडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com