सातारा मेडिकल कॉलेजसाठी उदयनराजेंची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा; वाढीव जागांना परवानगीची केली मागणी  - MP Udayanraje discusses with Union Health Minister for Satara Medical College; Demand for permission for additional seats | Politics Marathi News - Sarkarnama

सातारा मेडिकल कॉलेजसाठी उदयनराजेंची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा; वाढीव जागांना परवानगीची केली मागणी 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

सातारा शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रक्रियेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहभाग घ्यावा तसेच  कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त वाढीव जागांना परवानगी मिळावी, अशी मागणी उदयनराजेंनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. 

सातारा : सातारा शासकिय मेडिकल कॉलेजच्या संदर्भात आज नवी दिल्लीत खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली. तसेच प्रस्तावित शासकिय मेडिकल कॉलेज संदर्भात सकारात्मक चर्चा करून कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त वाढीव जागांना परवानगी मिळावी, याची मागणी केली.

साताऱ्यातील शासकिय मेडिकल कॉलेजच्या उभारणी संदर्भातील प्रक्रिया सध्या सुरू आहे. यावर्षी ४८५ कोटी रूपयांचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केलेला आहे. यामध्ये कॉलेजच्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम व यावर्षीचा प्रवेश प्रक्रिया होणार आहे. पण एमसीआयची तपासणीत पात्र ठरल्यासच प्रवेश प्रक्रियेला परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या तपासणीकडे आहे.

सध्या संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू असून यासाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेही दिल्लीत गेलेले आहेत. सातारा शासकिय मेडिकल कॉलेजच्या संदर्भात त्यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांची भेट घेतली. सातारा येथील प्रस्तावित शासकीय मेडिकल कॉलेज संदर्भात त्यांनी आरोग्य मंत्र्यांसोबत विविध प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा केली.

सातारा शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रक्रियेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहभाग घ्यावा तसेच  कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त वाढीव
जागांना परवानगी मिळावी, अशी मागणी उदयनराजेंनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख