श्रीनिवास पाटलांनी पुसले शेतकऱ्यांचे अश्रू; नुकसानग्रस्त केळीच्या बागेची केली पहाणी

राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज चचेगाव येथे भेट दिली. नुकसान झालेल्या केळी बागांची फिरून पाहणी केली. संबधीत शेतकऱ्यांना धीर दिला. भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दिले. कृषी विभागाला पंचनाम्याबाबत अवश्यक सुचना दिल्या. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतर काही योजनेतून मदत मिळवून देता येते का. त्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार पाटील यांनी दिली.
MP Srinivas Patil wipes away farmers' tears; Inspection of damaged banana orchard
MP Srinivas Patil wipes away farmers' tears; Inspection of damaged banana orchard

विंग (ता. कराड) : वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान झालेल्या चचेगांव (ता. कराड) येथील केळीच्या बागाची (Banana orchard) पाहणी साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसताना नुकसानीचे पंचनामे करून त्वरीत भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. (MP Srinivas Patil wipes away farmers' tears; Inspection of damaged banana orchard)

चक्रीवादळात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तुफान वाऱ्याच्या गतीमुळे चचेगांव परिसराला त्याचा सर्वाधिक मोठा फटका बसला. येथील विलास पवार, साहेबराव पवार, हनुमंत हुलवान, संदीप पवार, रेखा हुलवान आदी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बागा मोडून पडल्या आहेत. सात एकरावरील हातातोंडाला आलेला घास वादळाने हिरावून नेला. केळी तोडून विक्रीस नेणार तत्पुर्वीच वादळी वाऱ्याने बागा अक्षरशा भुईसपाट केल्या. त्यात २० लाखांचे नुकसान झाले. 

राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज चचेगाव येथे भेट दिली. नुकसान झालेल्या केळी बागांची फिरून पाहणी केली. संबधीत शेतकऱ्यांना धीर दिला. भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दिले. कृषी विभागाला पंचनाम्याबाबत अवश्यक सुचना दिल्या. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतर काही योजनेतून मदत मिळवून देता येते का. त्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार पाटील यांनी दिली. 

यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलतराव चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, कृषी सहाय्यक बाळासाहेब माळी, तलाठी एम.एस. राऊत, पोलिस पाटील प्रशांत पाटील यासह कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com