ठाकरे सरकारची अवस्था आंधळ दळतंय अन्‌ कुत्रं पीठ खातंय अशी झालीय... - MP Ranjitsingh Naik Nimbalkar's scathing criticism on Thackeray government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ठाकरे सरकारची अवस्था आंधळ दळतंय अन्‌ कुत्रं पीठ खातंय अशी झालीय...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 31 मार्च 2021

कोरोनामुळे लोकांच्याकडे पैसे नसताना वीजबील भरण्याचा तगादा या सरकारने जनतेकडे लावला आहे. वीजबिल भरत नाहीत म्हणुन वीज कनेक्शन तोडली जातात, ही शर्मेची बाब असुन मुख्यमंत्रीही यामध्ये लक्ष देत नाहीत.

सातारा : तीन पक्षाचे सरकार हे पैसे कमविण्याच्या हेतुने एकत्र आले असुन कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात असुन हे सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे.  कोरोनामुळे लोकांच्याकडे पैसे नसताना वीजबील भरण्याचा तगादा या सरकारने जनतेकडे लावला आहे. वीज भरत नाही म्हणुन वीज कनेक्शन तोडली जातात ही शर्मेची बाब असुन मुख्यमंत्रीही यामध्ये लक्ष देत नाहीत. त्यामुळे ठाकरे सरकारची अवस्था आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी झाली आहे, अशी टीका माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. 

वेगळ्या विचारांचे तीन पक्ष निवडणूकीत एकमेकांना शिव्या देत होते. हेच तीन पक्ष केवळ पैसे कमविण्याच्या हेतूने एकत्र येऊन सत्तेवर बसले आहेत, असे स्पष्ट करून रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, कोरोनाच्या काळात हे सरकार अपयशी झाले आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात झालेले आहेत. कोरोनाची क्रिटीकल परिस्थितीत हाताळण्यात महाराष्ट्र सरकार फेल गेले आहे.

कोरोनामुळे लोकांच्याकडे पैसे नसताना वीजबील भरण्याचा तगादा या सरकारने जनतेकडे लावला आहे. वीजबिल भरत नाहीत म्हणुन वीज कनेक्शन तोडली जातात, ही शर्मेची बाब असुन मुख्यमंत्रीही यामध्ये लक्ष देत नाहीत. त्यामुळे ठाकरे सरकारची अवस्था आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी झाली आहे. अंतर्गत कुरघोड्यांमुळे हे सरकार लवकरच पाय उतार होईल, असे भाकित ही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख