मोदी हे देशातील सर्वात मोठे बिनकामाचे नेते... - Modi is the biggest unemployed leader in the country ... | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी हे देशातील सर्वात मोठे बिनकामाचे नेते...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 मे 2021

कोविडच्या काळात मोदी सरकारवर काँग्रेसकडून सातत्याने समाज माध्यमातून हल्ला चढविला जात आहे. कोविड रूग्णांचा खरा आकडा आता गंगा नदीत सापडण्यास सुरूवात झाली आहे, असे सांगणारे एक कार्टून त्यांनी ट्विट केले असून त्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

सातारा : सध्या देशात तसेच महाराष्ट्रात कोविड 19 (Covid 19) मुळे हाहाकार माजला आहे. कोविड बाधितांची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, अशी टीका काँग्रेसमधून होत आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आज (बुधवार) एक फोटो व एक कार्टून आपल्या ट्विटर अकौंटवर टाकून पंतप्रधान मोदी यांना देशातील सर्वात मोठे बिनकामाचे नेते असल्याचे ट्‌विटच्या माध्यमातून मांडले आहे. (Modi is the biggest unemployed leader in the country ...)

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे नॉन परफोर्मिंग असेट असल्याचे एक चित्र पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट केले आहे. श्री. चव्हाण यांनी नरेंद्र मोदींच्या छायाचित्रासह केलेले हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. त्यामध्ये भारतातील सर्वोच्च बिनकामाचा नेता असेही श्री. चव्हाण यांनी मोदींना म्हटले आहे. यासोबतच गंगा नदीत सापडलेल्या कोविड बाधित रूग्णांच्या प्रेतावरूनही भाजपावर टीका केली आहे. श्री. चव्हाण यांच्या ट्विटवर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया पडू लागल्या आहेत.

हेही वाचा : लॉकडाउन करा! टास्क फोर्सने मोदी सरकारला संसर्ग वाढण्यापूर्वीच केली होती शिफारस

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोन्ही ट्विटीचीकोविडच्या काळात मोदी सरकारवर काँग्रेसकडून सातत्याने समाज माध्यमातून हल्ला चढविला जात आहे. कोविड रूग्णांचा खरा आकडा आता गंगा नदीत सापडण्यास सुरूवात झाली आहे, असे सांगणारे एक कार्टून त्यांनी ट्विट केले असून त्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.  नेटिझन्सनी चांगलीच दखल घेतली आहे. नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीवरून परदेशातूनही टीका होत आहे. आता भारतातील सर्वोच्च नाकर्ता नेता, बिनकामाचा नेता म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख