पडळकरांची जीभ घसरली; अजित पवारांना दिली लांडग्याची उपमा...
Padalkar's tongue slipped; The parable of the wolf given to Ajit Pawar ...

पडळकरांची जीभ घसरली; अजित पवारांना दिली लांडग्याची उपमा...

महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाचा सावळा गोंधळ सुरू केला आहे, असे सांगून ते म्हणाले,मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झाले यावरून ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि उप समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यातील विसंवाद समोर आला आहे. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. नक्की काय झाले हे सांगावे.

सांगली : ओबीसी समाजाला नोकरीत पदोन्नती आरक्षण (OBC Reservation) मिळावे, यासाठी २००६ मध्ये मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी ओबीसींना १९ टक्के पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याची शिफारस केली होती. पण ते अद्याप अंमलात आणलेली नाही. अजित पवार (Ajit Pawar) यांना मागासवर्गीय नोकरी पदोन्नती आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे प्रमुख करणे म्हणजे, मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करावी, असे होईल, असा टोला आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे. (MLC Padalkar's tongue slipped; The parable of the wolf given to Ajit Pawar)

गोपीचंद पडळकर म्हणाले, राज्यातील मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणावरून जो सावळा गोंधळ सुरू आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी. महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाचा सावळा गोंधळ सुरू केला आहे, असे सांगून ते म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झाले यावरून ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि उप समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यातील विसंवाद समोर आला आहे. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. नक्की काय झाले हे सांगावे. 

तसेच ओबीसी समाजाला नोकरीतील पदोन्नती आरक्षण मिळावे, यासाठी  २००६ मध्ये मंत्रीमंडळ उपसमिती गठित झाली होती, असे सांगून आमदार पडळकर म्हणाले, उपसमितीने ओबीसींना १९ टक्के पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याची शिफारस केली होती. पण अद्याप सरकारने अंमलात आणले नाही. अजित पवार यांना मागासवर्गीय नोकरी पदोन्नती आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे प्रमुख करने म्हणजे मेंढरांनी लांडग्या कडून संरक्षणाची अपेक्षा करावी अशा पद्धतीचे होईल, असा टोला अजित पवार यांना लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in