बॅक फुटवर गेलेले मिटकरी म्हणाले, जे जे फिरले त्यांना माझा दंडवत.....

विरोधी सदस्यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला मात्र, सभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांना सभापतींकडे बघून बोला असे सांगितले.मिटकरी म्हणाले, सभागृहात बाजारातील व रस्त्यावरील भाषणे चालत नाहीत हे मला मान्य आहे. मी नवीन आहे. विद्यार्थी वाहन शिकत आहे. हळूहळू पुढे जाणार आहे. माझ्या भाषणाला तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
MLC Mitkari says "I bow to those who turned around ....."
MLC Mitkari says "I bow to those who turned around ....."

सातारा :  कोरोना संकट काळात प्रमुख नेत्यांसह मंत्र्यांनी केलेल्या दौऱ्याचा मुद्दा अमोल मिटकरी यांनी सभागृहात मांडला. पण मुनगंटीवार, चंद्रकांत दादा, गिरिश महाजन व देवेंद्र फडणवीस मला कुठेही फिरताना दिसले नाहीत. बहुदा ते कोरोनापासून कसे वाचता येईल हे पहात होते, असा टोला त्यांनी लगावला. त्यावर विरोधी सदस्यांनी आक्षेप घेत मिटकरींना रोखले. प्रवीण दरेकरांनी संतप्त होत फडणवीसांच्या प्रतिमेला तडा जात आहे. त्याची दुरूस्ती करतो, असे त्यांनी सांगितले. यानंतर भाजपच्या सदस्यांनी मिटकरींना मुख्यमंत्री फिरलेत का, असा प्रश्न केला. त्यावर मिटकरींनी जे जे फिरले असतील, त्यांना माझा साष्टांग दंडवत, असे सांगून आपले भाषण सुरू केले. 

विधान परिषदेच्या अधिवेशनात अमोल मिटकरी यांनी आपले प्रथमच भाषण केले. त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर मत व्यक्त करतानाच कोरोनाच्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या कामाचे कौतूक केले. ते म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्राच्या सरकराने सर्वसामान्यांची मने जिंकण्याचे काम केले. कोरोनाने संकटाचे साम्राज्य निर्माण झाले होते. ज्या वेळी संकटात होत, त्यावेळी मुख्यमंत्री फेसबुक व दूरदर्शनच्या माध्यमातून संवाद साधत होते. जनतेला बळ देत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,  कृषीमंत्री दादा भुसे यांनीही भूमिका बजावली. शासन व प्रशासनाचा वेगळा आदर्श पहायला मिळाला. रात्रन दिन आम्हा युध्दाचा प्रसंग.. या प्रमाणे आघाडी सरकारने आसमानी, सुलतानी संकटाला तोंड देऊन राज्य पुढे नेले. कोरोनाच्या काळात केंद्राने खासदारांचा निधी थांबविला. पण महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी आमदारांना समसमान निधीचे वाटप केले.

कोणत्याही आमदारांच्या निधीला कात्री लावली नाही.  हे धाडस अर्थमंत्री अजित पवार यांनी दाखवले व अर्थव्यवस्थेचा कणा शाबूत ठेवला. या संकटाच्याकाळात केंद्राने राज्याचा जीसएसटीचा पैसा रोखला. कोरोनाच्या काळात विरोधी आमदारांनी आला निधी पीएम फंडाला पाठवून अन्याय केला. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे. त्यांचे कौतूक होत आहे.
 
नोटबंदीनंतर केंद्राने महाराष्ट्राचा जीडीपी रेट वाढणार असे सांगितले होते. पण प्रत्यक्षात जी म्हणजे गॅस, डी म्हणजे डिझेल आणि पी म्हणजे पेट्रोलचा दर वाढला. मुळ मुद्द्याला बगल देण्याकरिता चांगले काम करणाऱ्या सरकारवर विरोधी पक्ष आज आरोप करत आहेत. कोरोना संकट काळात शरद पवारसाहेबांनी दौरे करून जनतेला आधार दिला. उद्धव ठाकरेंनी जनतेला बळ दिले. अजित पवारांनी ही साथ दिली.

नाना पटोले, नितीन राऊत, प्रवीण दरेकर यांनीही दौरे केले. पण मुनगंटीवार, चंद्रकांत दादा, गिरिश महाजन व देवेंद्र फडणवीस मला कुठेही फिरताना दिसले नाहीत. बहुदा ते कोरोनापासून कसे वाचता येईल हे पहात होते. असे म्हणतातच विरोधी सदस्यांनी आक्षेप घेत मिटकरींना रोखले. त्यावर प्रवीण दरेकर संतप्त झाले व म्हणाले, ही जाहीर सभा किंवा रस्त्यावरची सभेतील भाषण नाही. देवेंद्र फडणवीस माझ्यासोबत फिरत होते.

निससर्ग वादळ, कोरोना सेंटर, अवकाळीतील नुकसानीचा पाहणी दौरा अशा प्रत्येक ठिकाणी ते गेले होते. मिटकरींच्या या भाषणातून फडणवीसांच्या प्रतिमेला तडा जात आहे. त्याची मी दुरूस्ती करतो, असे त्यांनी सभापतींना सांगितले.  यानंतर भाजपच्या सदस्यांनी मिटकरींना तुमचे मुख्यमंत्री फिरलेत का, असा प्रश्न करून गोंधळ घातला. त्यावर मिटकरींना जे जे फिरले असतील, त्यांना माझा साष्टांग दंडवत, असे सांगून आपले भाषण सुरू केले.

तरीही विरोधी सदस्यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला मात्र, सभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांना सभापतींकडे बघून बोला असे सांगितले. मिटकरी म्हणाले, सभागृहात बाजारातील व रस्त्यावरील भाषणे चालत नाहीत हे मला मान्य आहे. मी नवीन आहे. विद्यार्थी वाहन शिकत आहे. हळूहळू पुढे जाणार आहे. माझ्या भाषणाला तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

ते म्हणाले, सरकार सर्व आघाड्यांवर चांगले काम करत असताना त्याच सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या निधीतून रूग्णांना दिलेल्या मदतीत भ्रष्टाचार झाला आहे. एकुण १५०० कोटींची मदत वितरित केल्याचे म्हटले आहे. तर प्रत्यक्षात ५२६ कोटींच्या मदतीचे वाटप झाले आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असा मुद्दा त्यांनी मांडला. 

प्रसाद लाड यांनी मांडलेला महिलांवरील वाढलेल्या अत्याचाराचा मुद्द्याचा धागा पकडून श्री. मिटकरी म्हणाले, महाराष्ट्रात, देशात महिला असुरक्षित आहेत. त्याचे दोषारोपण कोणावर करावे, हे महत्वाचे आहे. मी कोणाच्या चुकीच्या वागणूकीचे समर्थन नाही. महिला अत्याचाराबाबत दैनिक सकाळ च्या अंकात आलेली महिलांवरील अत्याचारात भाजपचे खासदार आघाडीवर, २१ खासदारांच्याविरोधात अत्याचाराचे गुन्हे दाखल, हे वृत्त त्यांनी वाचून दाखविले. शेवटी त्यांनी राममंदीरासाठी निधी जमा करण्याचे काम सुरू आहेत. त्याप्रमाणे जगतगुरू तुकाराम महाराजाच्या मंदीराललाही मदत करावी, असे सांगून गडकिल्ले यांचे संवर्धन करावे, शिवजयंतीवेळी दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com