आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी सुरू केले कोविड सेंटर; 80 बेडमध्ये 32 ऑक्‍सिजनचे बेड - MLA Shivendrasinharaje started Covid Center; 32 oxygen beds in 80 beds | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी सुरू केले कोविड सेंटर; 80 बेडमध्ये 32 ऑक्‍सिजनचे बेड

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि बेड मिळाला नाही म्हणून कोणाचा जीव जाऊ नये. या हेतूने शिवेंद्रसिंहराजे यांनी सेंटर पुन्हा रुग्णसेवेसाठी स्वखर्चाने तयार करून श्वास हॉस्पिटलकडे चालवण्यासाठी दिले आहे.  कठीण परिस्थितीत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, याच उद्देशाने सेंटर पुन्हा सुरू करत असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. 

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. सध्या बेड शिल्लक नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या स्थितीला आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, या हेतूने साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबीयांनी त्यांच्या मालकीच्या पुष्कर मंगल कार्यालयात पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या सेंटरमध्ये 32 ऑक्‍सिजनयुक्त बेडसह 80 बेडचे हे सेंटर रुग्णसेवेसाठी सज्ज होत असून, येत्या दोन दिवसांत हे सेंटर सुरू होणार आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांनी पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने 80 बेडचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारून विनामोबदला रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून दिले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे सेंटर बंद करण्यात आले होते. 

आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि बेड मिळाला नाही म्हणून कोणाचा जीव जाऊ नये. या हेतूने शिवेंद्रसिंहराजे यांनी सेंटर पुन्हा रुग्णसेवेसाठी स्वखर्चाने तयार करून श्वास हॉस्पिटलकडे चालवण्यासाठी दिले आहे.  कठीण परिस्थितीत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, याच उद्देशाने सेंटर पुन्हा सुरू करत असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख