रोहित पवार करणार भूस्खलनग्रस्तांचे दुःख हलकं; उद्या कऱ्हाड, पाटण दौऱ्यावर  

आमदार श्री. पवार चिपळूणमार्गे कोयनानगर, पाटण करून ते कराडमध्ये येणार आहेत. गुरूवारी आमदार श्री. पवार कोल्हापूर व सांगलीचा दौरा करणार आहेत.
रोहित पवार करणार भूस्खलनग्रस्तांचे दुःख हलकं; उद्या कऱ्हाड, पाटण दौऱ्यावर  
MLA Rohit Pawar Tomarrow Visit Landslide area in Patan taluka

कऱ्हाड : कऱ्हाड, पाटण तालुक्यात निर्माण झालेली पुरस्थिती व भूस्खलन झालेल्या भागाची पहाणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार उद्या (बुधवारी) दौऱ्यावर येत आहेत. मुसळधार पावासाने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा व भूस्खलनाचा फटका बसलेल्या भागाची ते पहाणी करणार आहेत. MLA Rohit Pawar Tomarrow Visit Landslide area in Patan taluka

पूरपरिस्थिती ओसरत असून भूस्खलन झालेल्या भागातील लोकांचे तात्पुरते स्थलांतरण करण्यात आले आहे. पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांचा पहाणी दौरा करण्यासाठी आमदार रोहित पवार पाटणच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानंतर ते कराडमधील पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करणार आहेत. 

यावेळी ते काहींना मदत करण्यासह त्यांचे दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आमदार श्री. पवार चिपळूणमार्गे कोयनानगर, पाटण करून ते कराडमध्ये येणार आहेत. गुरूवारी आमदार श्री. पवार कोल्हापूर व सांगलीचा दौरा करणार आहेत. गुरूवारी सायंकाळी ते वाई येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पहाणी करून नागरीकांशी संवाद साधणार आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in