आमदार महेश शिंदेंचे कुटुंब २४ तास कोरोना रूग्णांच्या सेवेत..... - MLA Mahesh Shinde's family in the service of Corona patients 24 hours a day ..... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

आमदार महेश शिंदेंचे कुटुंब २४ तास कोरोना रूग्णांच्या सेवेत.....

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 18 मे 2021

या रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रूग्णांची तपासणी करणे, त्यांची विचारपूस करणे, त्यांना ॲडमिट करून घेण्यासोबतच रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्याचे कामही हे कुटुंब करत आहे.

सातारा : कोरेगावचे (Koregaon) शिवसेनेचे (Shivsena) आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) व त्यांचे कुटुंब कोरोना रूग्णांच्या सेवेत रमले आहे. मतदारसंघातील बाधित रूग्णांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी दोन हॉस्पिटल (Corona Hospital) स्वखर्चाने उभी केली आहेत. येथे सर्व उपचार, रुग्ण सेवा, जेवण, नाष्टा, प्राथमिक औषधे ही मोफत पुरवली जात आहेत. शिंदे कुटुंब मतदारसंघातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी २४ तास झटत आहे. त्यांच्या या कामाचे जिल्हाभरातून कौतूक होत आहे. (MLA Mahesh Shinde's family in the service of Corona patients 24 hours a day)

सातारा जिल्हा सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींनीही आपापल्या मतदारसंघात कोरोना केअर सेंटर, कोरोना हॉस्पिटल उभारून तेथे रूग्णांना तातडीने उपचार मिळवून दिले जात आहेत. या सगळ्यात आघाडी घेतलीय ती कोरेगावचे आमदार महेश शिंदे व त्यांच्या कुटुंबाने. 

हेही वाचा : कोरोनातही शिवसेनेची महापालिका निवडणुकीची तयारी

आमदार महेश शिंदे यांच्या सोबत त्यांची पत्नी डॉ. प्रिया शिंदे तसेच आमदारांच्या भगिनी डॉ. अरुणा बर्गे यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत त्यांनी श्री काडसिद्धेश्वर कोविड सेन्टर, कोरेगाव आरएच हॉस्पिटल येथे १४० ऑक्सिजन व नॉर्मल बेड तसेच श्री काडसिद्धेश्वर कोविड सेन्टर, जितराज मंगल कार्यालय, कोरेगाव येथे १३० ऑक्सिजन व नॉर्मल बेड अशा दोन कोविड सेन्टरच्या माध्यमातून कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहेत.

आवश्य वाचा : `या`मुळे रांगेत नाही तर घरबसल्या मिळेल लस, जाणून घ्या कसे!

दोन्ही हॉस्पिटल आमदार महेश शिंदे यांनी स्वखर्चातून उभी केली आहेत. येथे सर्व उपचार, रुग्णसेवा, जेवण, नाष्टा, प्राथमिक औषधे ही मोफत पुरवली जातात. विशेष म्हणजे या मतदारसंघातील जनता ही या कोविड सेन्टरला वस्तुरूपात, आर्थिक स्वरूपात मदत करत आहे. ही रुग्ण सेवा आमदारांनी लोकसहभागातून लोकचळवळीकडे नेली आहे. 

या रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रूग्णांची तपासणी करणे, त्यांची विचारपूस करणे, त्यांना ॲडमिट करून घेण्यासोबतच रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्याचे कामही हे कुटुंब करत आहे. विविध भागातून रुग्णांचे येणाऱ्या फोनवर तेथील स्थानिक लोकांची मदत घेऊन ॲडमिट होण्यासाठी सांगतात. तसेच गरज पडेल तेथे रुग्णवाहिकेची उपलब्धता करून देतात. रुग्णांना व नातेवाईकांना काळजी करू नका आम्ही आहोत, असा धीर ही देत आहेत. आमदार शिंदे कुटुंबांची ही कोरोना रूग्णांची सेवा २४ तास अखंड सुरू असते. त्यामुळे मतदारसंघातील नागरीकांना दिलासा मिळाला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख