आमदार महेश शिंदे म्हणतात, आम्ही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेशी सामना करण्यास सज्ज 

खाजगी रुग्णालयांच्या तुलनेत केवळ 3 ते 5 हजार रुपयांमध्ये, फार गंभीर असेल तर 5 ते 10 हजारांमध्ये किंबहुना अतीगंभीर रुग्णांना केवळ 10 ते 15 हजार रुपये खर्च येत आहे. आम्ही रुग्णाचा जीव वाचावा, यासाठी अहोरात्र झटत आहोत, कोणत्याही परिस्थितीत मृत्युदर कमी झाला पाहिजे, यासाठी आमच्या टीमचे प्रयत्न असल्याचेही आमदारशिंदे यांनी सांगितले.
आमदार महेश शिंदे म्हणतात, आम्ही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेशी सामना करण्यास सज्ज 
MLA Mahesh Shinde says, we are ready to face the third wave of corona

कोरेगाव : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेशी (Corona Third wave) सामना करण्यास काडसिध्देश्‍वर कोविड हॉस्पिटल्सची (Kadshidheshwar Covid Hospital) सर्व युनिट्स सज्ज आहेत. पहिल्या, दुसर्‍या लाटेत आम्ही अत्यंत कार्यक्षमपणे काम केल्याने हजारो लोकांचे जीव वाचवू शकलो आहे. तिसर्‍या लाटेत देखील सर्वसामान्यांना, लहान मुलांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी आतापासून तयारी केली आहे. तज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांची टीम तैनात करण्यात आलेली असून, त्यामुळे कोरेगाव मतदारसंघातील जनतेने निर्धास्त रहावे. मात्र कोविडच्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde ) यांनी केले. MLA Mahesh Shinde says, we are ready to face the third wave of corona

कोरेगाव मतदारसंघात पहिल्या लाटेच्यावेळी काडसिध्देश्‍वर कोविड हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली, त्यावेळी सात हजार ३० रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करुन बरे केले. तर कोविड हॉस्पिटलमध्ये 1430 रुग्णांवर यशस्वीरित्या औषधोपचार केले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवेळी आम्ही उपजिल्हा रुग्णालयात काडसिध्द कोविड हॉस्पिटलची उभारणी केली, तद्‌नंतर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची हेळसांड होऊ नये यासाठी उत्तर विभागातील महत्वाचे केंद्र असलेल्या अंबवडे संमत कोरेगाव येथील श्रीराम चौकात असलेल्या रघुकूल मंगल कार्यालयात तिसरे युनिट कार्यान्वित केले आहे. 

लवकरच चिमणगांव येथे चौथे युनिट कार्यान्वित केले जात असून, त्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. सद्यस्थितीत काडसिध्देश्‍वर कोविड हॉस्पिटल्सच्या सर्व युनिट्समध्ये 400 पेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्सची क्षमता असून, तेथे अत्यंत गंभीर रुग्णांवर देखील उपचार केले जात आहेत, कोणाही रुग्णाला परत पाठविले जात नाही, रुग्णांना मोफत चहा, नाष्टा व जेवण दिले जात असून, औषधे मात्र लिहून दिली जातात.

कोणत्याही औषध दुकानातून औषधे आणण्याची मुभा असून, त्याबाबत कसलीही सक्ती केली जात नाही. त्यामुळे खाजगी रुग्णालयांच्या तुलनेत केवळ 3 ते 5 हजार रुपयांमध्ये, फार गंभीर असेल तर 5 ते 10 हजारांमध्ये किंबहुना अतीगंभीर रुग्णांना केवळ 10 ते 15 हजार रुपये खर्च येत आहे. आम्ही रुग्णाचा जीव वाचावा, यासाठी अहोरात्र झटत आहोत, कोणत्याही परिस्थितीत मृत्युदर कमी झाला पाहिजे, यासाठी आमच्या टीमचे प्रयत्न असल्याचेही आमदार शिंदे यांनी सांगितले. 

डॉ. अरुणा बर्गे म्हणाल्या, आमचे युनिट्स 24 तास सुरु असून, तज्ञ डॉक्टर्स तेथे कार्यरत आहेत, त्यामुळे वेळी-अवेळी येणार्‍या प्रत्येक रुग्णास आम्ही दाखल करुन घेतो, रुग्णाच्या वयाचा विचार करुन, त्याची सर्वंकष माहिती त्याच्याकडून अथवा त्याच्या नातेवाईकाकडून घेतली जाती. त्यानंतर मधुमेह असल्यास त्याची दिवसभरात वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात. त्याचबरोबर सर्वच रुग्णांची दिवसभरात चार ते पाच वेळा ऑक्सिजनची तपासणी केली जाते. वयोवृध्द रुग्णांचे मनपरिवर्तन करणे अवघड असताना, आम्ही त्यांचे समुपदेशन करतो, त्यामुळे लवकरात लवकर रुग्ण बरा होतो, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

कोविड हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना दाखल करा
कोरेगाव तालुक्यात कोविड हॉस्पिटल्समध्येच कोरोना रुग्णांना अधिक चांगल्याप्रकारे उपचार केले जातात, तेथे उपचाराची कार्यपध्दती ठरलेली आहे, त्यामुळे विनाकारण विलगीकरण कक्ष अथवा सी. सी. सी. मध्ये रुग्ण दाखल करण्याचे टाळावे, असे आवाहन करुन आमदार महेश शिंदे यांनी सांगितले की, गावपातळीवर प्रत्येकाने, प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने, नेत्याने जर मनात पक्के केले की, रुग्णाला लक्षणे दिसतात, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्ण कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केला तरच त्याचा जीव वाचू शकतो, त्यामुळे कृपया राजकारण न करता, प्रत्येकाचा जीव वाचवायचा असेल तर त्याला वेळीच योग्य ठिकाणी उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले. 

'काडसिध्देश्‍वर'मध्ये कॅश काऊंटर नाही...
आमदार महेश शिंदे यांचे निकटवर्तीय राहूल प्र. बर्गे यांनी सांगितले की, काडसिध्देश्‍वर कोविड हॉस्पिटल्समध्ये कोणत्याही स्वरुपाचे कॅश काऊंटर नाही. आम्ही रुग्णाकडून अथवा त्याच्या नातेवाईकाकडून एकही रुपया घेत नाही. ज्या रुग्णाची औषधोपचार घेण्याची परिस्थिती नाही, अशांवर पूर्णपणे मोफत औषधोपचार केले जातात. औषधे देखील दिली जातात. आम्ही समर्पित भावनेने 24 तास काम करत आहोत. सर्वसामान्य जनता, सामाजिक संस्था आमच्या उपक्रमांना मदत करत आहेत. 

रुग्णांना सकस आणि पौष्टिक आहार
काडसिध्देश्‍वर कोविड हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत असलेल्या प्रत्येक रुग्णाला आम्ही सकस आणि पौष्टिक आहार देत असून, सेंद्रीय पध्दतीच्या भाज्या आम्हाला मतदारसंघातील शेतकरी मोफत पुरवतात. रुग्णांची सकाळपासून रात्रीपर्यंत काळजी घेतली जाते, अशी माहिती संतोष जाधव व प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in