संचारबंदीवर गृहराज्यमंत्र्यांची करडीनजर; रस्त्यावर उतरून केली पहाणी 

अडचणीच्या काळात जशी जनतेकडून आपण सहकार्याची अपेक्षा ठेवतो तशी जनतेचीही आपल्या प्रशासनाकडून अपेक्षा असते. सर्वांच्या सहकार्यातुन कोरोना विरुध्दचा सुरु असलेला लढा यशस्वी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जशी या महामारीच्या संकटात जनतेची काळजी घेण्याची गरज आहे. तशीच जनतेनेही स्वत:ची आणि स्वत:च्या परिवाराची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai took to the streets to inspect the law and order situation
Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai took to the streets to inspect the law and order situation

सातारा : राज्यात बुधवारी रात्री आठपासून लागू केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी सकाळपासून रस्त्यावर उतरुन पोलिस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सातारा जिल्हयातील ग्रामीण भागाची प्रत्यक्ष बंदोबस्त व कायदा सुव्यवस्थेची पहाणी केली.

बाजारपेठा तसेच मुख्य रस्त्यावर अशा विविध सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी होऊ नये. नागरिक विनाकारण घराच्या बाहेर पडू नयेत याकरीता संचारबंदी कडक करा व गर्दी थांबविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाय योजना करा अशा सक्त सुचना त्यांनी महसूल, पोलिस अधिकाऱ्यांना केल्या.गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी आज सातारा जिल्हयातील कोरेगाव, रहिमतपूर व मसूर विभागातील मुख्य बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवरील ग्रामीण भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

यावेळी त्यांचेसोबत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश
शिंदे, शिवसेना संपर्कनेते प्रा.नितीन बानुगडे पाटील हे पदाधिकारी तर कोरेगांव उपविभागीय अधिकारी श्रीमती जयश्री पाटील, कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, कोरेगांव उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. किंद्रे, कराड उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजित पाटील, कोरेगांव तहसिलदार अमोल कदम, कराड तहसिलदार अमरदीपवाकडे, कोरेगांव पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे, रहिमतपुर सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश कड, रहिमतपुर सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री देसाईंनी कोरेगांव, रहिमतपुर व मसूर विभागामध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने तालुका प्रशासनाच्या वतीने काय काय उपाय योजना करण्यात आल्या आहेत, याची सविस्तर माहिती घेतली. शंभूराज देसाई म्हणाले, कोविड 19 चा संसर्ग सध्या दुप्पट वेगाने होत असल्याने राज्यात काल रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सातारा जिल्हयात संसर्ग होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढू लागले असताना संचारबंदीच्या काळात गर्दी होऊ नये याकरीता पोलिस व महसूल विभागाची स्वतंत्र पथके तयार केली आहेत. 

तुरळक ठिकाणी भाजी मंडई आणण्याच्या नावाखाली किंवा काही किरणा खरेदी करण्याच्या नावाखाली थोडीसी गर्दी आहे. आज पहिला दिवस आहे म्हणून आपण रस्त्यावर उतरणाऱ्यांना समजून सांगण्याचे काम करावे. खरोखरच काम असेल तरच नागरिकांनी घराचे बाहेर पडावे. संचारबंदीच्या काळात विनाकारण कोणी फिरताना दिसले तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी. कोरोनाचा संसर्ग होवू नये याकरीता जसे प्रशासन सज्ज आहे तसेच नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करुन स्वत:ची व त्यांच्या कुटुंबिंयांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

संचारबंदीमध्ये तालुक्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली असली तरी अत्यावश्यक सेवा सुरु ठेवून नागरिकांना सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनानेही ठेवावी. अडचणीच्या काळात जशी जनतेकडून आपण सहकार्याची अपेक्षा ठेवतो तशी जनतेचीही आपल्या प्रशासनाकडून अपेक्षा असते. सर्वांच्या सहकार्यातुन कोरोना विरुध्दचा सुरु असलेला लढा यशस्वी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जशी या महामारीच्या संकटात जनतेची काळजी घेण्याची गरज आहे. तशीच जनतेनेही स्वत:ची आणि स्वत:च्या परिवाराची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com