साताऱ्यातील घटनेचा गृहराज्यमंत्र्यांनी नोंदविला निषेध; विघातक प्रवृत्तींना शोधून कडक कारवाई करणार  - Minister of State for Home Affairs reports protest in Satara; Strict action will be taken to find destructive tendencies | Politics Marathi News - Sarkarnama

साताऱ्यातील घटनेचा गृहराज्यमंत्र्यांनी नोंदविला निषेध; विघातक प्रवृत्तींना शोधून कडक कारवाई करणार 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 9 जानेवारी 2021

हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. मला हा प्रकार समल्यावर मी तातडीने सर्व पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. तसेच अज्ञान व्यक्तीविरूध्द तातडीने गुन्हा दाखल करा, असे सांगितले.

सातारा : ग्रेड सेपरेटरचा फलक फाडल्याच्या घटनेचा निषेध करत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्याची सूचना पोलिस अधीक्षकांना केली आहे. तसेच अशा विघातक प्रवृत्तींना पोलिसांनी शोधून काढून त्यांच्या कडक कारवाई करू, असे आश्वासन देऊन सातारकर जनतेने शांतता राखावी, असे आवाहन केले आहे. 

साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे काल खासदार उदयनराजेंच्या हस्ते उद्‌घाटन व नामकरण झाले होते. रात्री कोणी अज्ञात व्यक्तीने भुयारी मार्गाला लावलेला एक नाम फलक फाडला. यामुळे सातारा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेची तातडीने दखल घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पुन्हा नव्याने त्या ठिकाणी फलक लावला. त्यामुळे सातारा शहरातील तणावाची परिस्थिती निवळली आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. मंत्री देसाई म्हणाले, ग्रेड सेपरेटरचे नामकरण काल झाले होते. थोर विभुतींची नावे या भुयारी मार्गाला दिली होती. त्यापैकी एका फलकाला इजा पोचविली आहे.

हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. मला हा प्रकार समल्यावर मी तातडीने सर्व पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. तसेच अज्ञान व्यक्तीविरूध्द तातडीने गुन्हा दाखल करा, असे सांगितले. तसेच संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याची सूचना पोलिसांना केली आहे. त्यामुळे शिवप्रेमी जनतेने शांतता राखावी, आम्ही अशा विघातक प्रवृत्तींना शोधून काढून कठोर कारवाई करू. जनतेने शांतता राखावी, असे आवाहन मंत्री देसाई यांनी केले आहे. 
 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख