वाशिम : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी येथे दर्शन घेण्यासाठी निघाले असून श्री. राठोड यांच्यावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवीच्या पाच महंतांची बैठक होऊन त्यामध्ये मंत्री राठोड यांनी चौकशीला सामोरे जावे, असे धर्मपीठाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार पोहरादेवी येथे पोहोचल्यानंतर श्री. राठोड देवीचा आशिर्वाद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.
परळी येथील बंजारा समाजातील युवती पूजा चव्हाण हिने काही दिवसांपूर्वी पुण्यात आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुलीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. रविवारी (ता.१४) दिलेल्या प्रतिक्रियेत माझा कोणावरही संशय नाही, असे मत व्यक्त केले आहे.
तर तिच्या आजोबांनी सरकारने यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती. पुजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर विदर्भातील बंजारा समाजाचे तथा शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावर खूनाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानंतर राठोडही गायब होते. दरम्यान, आज (मंगळवारी) पोहरादेवी येथे दर्शनासाठी निघाले होते.
या संदर्भात महंत सुनील महाराज म्हणाले, हे प्रकरण बहुजन समाजासाठी शॉकिंग न्यूज होती. सत्य काय आहे, याबाबत आम्ही संभ्रमात होतो. आमच्या असे लक्षात आले की बहुजन समाजाचा एखादा नेता उदयास येतो, ज्यावेळी हा नेता हारत नाही तोपर्यंत संपविण्याचे कट केला जातो राठोड साहेबांना संपविण्याचा हा कट केलेले आहे. पुजा ही बंजारा समाजातील होतकरू मुलगी होती. तिचा आकस्मित मृत्यूय झालेला आहे. त्यांच्या दुखा सहभागी झालो होते. याचर सखोल चौकशी व्हावी न्याय व्यस्थेवर आमचा विश्वास आहे.
जितेंद्र महाराज म्हणाले, या प्रकरणाच्या चौकशीतून काहीतरी समोर येत नाही, तोपर्यंत कोणाला दोषी मानणे योग्य नाही. यामध्ये नेमके कोण दोषी आहे, या वर ते म्हणाले, चौकशीतून स्पष्ट झाल्याशिवाय आम्ही काहीही सांगू शकत नाही. चौकशी योग्य दिशेने सुरू आहे. सर्व महतांची बैठक झाली त्यांनी सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरे जावे, असे मंत्री राठोड यांना सांगण्यात आले आहे. समाजाचे ते संयमी नेतृत्व असून अशा नाजूक प्रकरणात एकदम पुढे येऊ ते काही बोलू शकत नाहीत. ज्यावेळी आरोप होतात, त्यावेळी हायकमांड सांगतील त्यावेळीच बोलावे लागते. आज दर्शन घेऊन झाल्यानंतर ते आपली भूमिका मांडणार आहेत.

