अजित पवार, रामराजे, सतेज पाटील लागणार पुन्हा निवडणुकीच्या कामाला...

त्यासाठीचे आदेश सहकार विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी काढले असून निवडणुकीस पात्र असणाऱ्या जिल्हा बँकांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर थांबविल्या आहेत, त्या टप्प्यापासून पुढे तात्काळ सुरू करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे म्हटले आहे.
अजित पवार, रामराजे, सतेज पाटील लागणार पुन्हा निवडणुकीच्या कामाला...
Ajit Pawar, Ramraje, Satej Patil will have to work for re-election ...

मुंबई : गेल्या पंधरा महिन्यांपेक्षा जास्त काळ संचालक मंडळाला मुदतवाढ मिळालेल्या राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने ऐन कोरोनाच्या काळातच घेतला आहे. त्यानुसार ३१ ऑगस्टनंतर तातडीने प्रारूप मतदारयाद्या तयार करण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत. राज्यातील २२ जिल्हा बँकांच्या निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच सभापती रामराजे नाईक निंबाळकर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते आता जिल्हा बँकांच्या निवडणुकीच्या कामाला लागणार आहेत. Ajit Pawar, Ramraje, Satej Patil will have to work for re-election ...

कोरोनामुळे राज्यातील ३१ जिल्हा बँकांच्या निवडणूका सहकार विभागाचे कार्यसन अधिकारी अनिल चौधरी यांनी स्थगित केल्या होत्या. कोरोनामुळे जिल्हा बँकांच्या निवडणूका होऊ शकल्या नव्हत्या. काही जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपून पंधरा महिन्यांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. कोरोनामुळे सहकार विभागाने ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या.

एकुण ३१ जिल्हा बँकांपैकी न्यायालयाच्या आदेशामुळे तीन जिल्हा बँकांच्या निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये परभणी-हिंगोली, बीड, नगर जिल्हा बँकांचा समवेश होता. आता उर्वरित २२ जिल्हा बँकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठीचे आदेश सहकार विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी काढले असून निवडणुकीस पात्र असणाऱ्या जिल्हा बँकांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर थांबविल्या आहेत, त्या टप्प्यापासून पुढे तात्काळ सुरू करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे म्हटले आहे.

त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या असलेल्या व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सातारा जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचीही निवडणूक होणार आहे. ही निवडणूक ठराव पूर्ण झाल्यानंतर स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे आता ठरावापासून पुढची प्रक्रिया येत्या एक सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम सहकार निवडणूक प्राधिकरण आगामी आठवड्यात जाहीर करणार आहे. 

त्यामुळे आता दिग्गज नेते सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागणार आहेत. पुणे जिल्हा बँकेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सातारा जिल्हा बँकेसाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, नांदेड जिल्हा बँकेसाठी अशोक चव्हाण, मुंबई जिल्हा बँकेसाठी प्रवीण दरेकर, लातूर जिल्हा बँकेसाठी अमित देशमुख, सांगली बँकेसाठी जयंत पाटील, जळगाव जिल्हा बँकेसाठी एकनाथ खडसे आदी दिग्गज नेते आता या जिल्हा बँकांच्या निवडणुकीच्या कामात गुंतणार आहेत. 

* सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार दृष्टिक्षेपात निवडणुका :

निवडणुकीस पात्र जिल्हा सहकारी बॅंका : २२ 
यामध्ये गडचिरोली, पुणे, यवतमाळ, अकोला, औरंगाबाद, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, मुंबई, जळगाव, धुळे, अहमदनगर, नाशिक, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती. 

* न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण : नऊ. यामध्ये 
यवतमाळ, गडचिरोली, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड, ठाणे. 

* सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू : एक अमरावती 

* निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन कोरोनामुळे स्थगिती असलेल्या बॅंका : १२  पुणे, लातूर , मुंबई, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे - नंदुरबार 

* २०२१ मध्ये निवडणुकीस पात्र बॅंका - बुलढाणा, सोलापूर, नागपूर. 

* निवडणुकीस पात्र नसलेल्या बॅंका - रायगड, जालना 

* न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका स्थगित असलेल्या बॅंका - गोंदिया, भंडारा, चंद्रपूर 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in