अपेक्षा पूर्तीमुळेच सहकार पॅनेलला सभासद साथ देणार; डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसलेंचे अर्ज दाखल - The members will support the co-operation panel only because it meets expectations; Dr. Suresh Bhosale, Atul Bhosale's application filed | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

अपेक्षा पूर्तीमुळेच सहकार पॅनेलला सभासद साथ देणार; डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसलेंचे अर्ज दाखल

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 31 मे 2021

सामान्य जनतेने निवडणुक हातात घेतली आहे. त्यामुळे विरोधकांनाही नेमकी काय भुमिका घ्यावी, त्याचा निर्णय सहा महिन्यापासून घेता आलेली नाही. लोकांचा कल विकासाच्या बाजूने, निस्वार्थीपणे कारखान्याचे हित बघणाऱ्यांच्या बाजूने आहे. त्यांनाच निवडून देण्याची सभासदांची भूमिका असल्याचा अंदाज आल्याने विरोधकांना नेमकी भूमिका घेता आलेली नाही, ते वास्तव आहे.

कऱ्हाड : सभासदांनी निवडून दिल्यानंतर सहा वर्षात सभासदांच्या अपेक्षांच्या पूर्तीचे काम आम्ही केले आहे. ऊस दर, ऊस तोडून नेणे, ऊस पिकाच्या आधुनिकीकरण, ऊस विकास कार्यक्रमासह अनेक उपक्रम सहा वर्षात आम्ही राबवले आहेत. तोच विकासात्मक कार्यक्रम घेऊन सभासदांसमोर जातो आहोत. त्यामुळे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला सभासद साथ देतील, असा विश्वास यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला. 

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखन्याच्या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसेले, डॉ. अतुल भोसले यांनी आपले अर्ज दाखल केले. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या बहुतांशी उमेदवारांचे आज अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर डॉ. भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला सभासद साथ देतील, असा विश्वास डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा : नेतृत्व बदलासाठी भाजप आमदारांचा दबाव

डॉ. भोसले म्हणाले, जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे जवळपास सर्व अर्ज भरून झाले आहेत. मागीलवेळी सभासदांनी आमच्या पॅनेलला निवडून दिले होते. याही वेळी आम्हाला विश्वास आहे. सभासदांनी निवडून दिल्यानंतर सहा वर्षात सभासदांच्या अपेक्षांच्या पूर्तीचे काम आम्ही केले आहे. ऊस दर, ऊस तोडून नेणे, ऊस पिकाच्या आधुनिकीकरण, ऊस विकास कार्यक्रमासह अनेक उपक्रम सहा वर्षात आम्ही राबवले आहेत. तोच विकासात्मक कार्यक्रम घेऊन सभासदांसमोर जातो आहोत. त्यात आम्हाला निश्चित यश यणार आहे.

आवश्य वाचा : मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह दहा शहरांत दुकानांच्या वेळा वाढणार

अतुल भोसले म्हणाले, जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले यांनी उमेदावारी अर्ज दाखल केला आहे. आमच्या पॅनेलचे सर्व संभाव्य उमेदवारही अर्ज दाखल करत आहेत. मागील सहा वर्षात जयवंतराव भोसले पॅनेलने कृष्णा कारखान्यात चांगले काम केले आहे. सभासदांच्या विश्वासाला पात्र राहुन काम करणारे पॅनेल म्हणून जयवंतराव भोसले सहकार पॅनेलकडे पाहिले जाते. त्यामुळे सभासद मोठ्या मताधिक्क्याने निवडणुकीत सहकार पॅनेलचा विजय करतील. तो विजय सभासदांचा असणार आहे.

सामान्य जनतेने निवडणुक हातात घेतली आहे. त्यामुळे विरोधकांनाही नेमकी काय भुमिका घ्यावी, त्याचा निर्णय सहा महिन्यापासून घेता आलेली नाही. लोकांचा कल विकासाच्या बाजूने, निस्वार्थीपणे कारखान्याचे हित बघणाऱ्यांच्या बाजूने आहे. त्यांनाच निवडून देण्याची सभासदांची भूमिका असल्याचा अंदाज आल्याने विरोधकांना नेमकी भूमिका घेता आलेली नाही, ते वास्तव आहे. मात्र तरीही विकासाच्या अजेंडा घेवून समोरे जायचे आहे. येणाऱ्या पाच वर्षात सहकार पॅनेल निवडून दिल्यानंतर सभासदांसाठी, शेतकऱ्यांसाठी आम्ही काय करणार आहोत. हाच अजेंडा आहे. कोरोनाच्या संकट काळात निवडणूक होत असल्याने सर्वांनी जबाबदारीने काम करण्याची गरज आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख