उद्धव ठाकरे असेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही..... - Marathas will not get reservation till Uddhav Thackeray is the Chief Minister ..... | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धव ठाकरे असेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही.....

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 31 मे 2021

राज्यातील सरकार स्थिर आहे, असे तुम्हाला वाटते का, यावर श्री. राणे म्हणाले, रात्री झोपले की सकाळी उजाडेपर्यंत सरकार जाऊ शकते, अशी परिस्थिती या सरकारची आहे. हे तीन पक्षाचे सरकार आहे. रोज काँग्रेस म्हणते आम्ही चाललो, शिवसेना म्हणते आम्हाला सहकार्य मिळत नाही, आम्ही चाललो. पण राष्ट्रवादी म्हणते कोणाचेही सरकार आले तरी आम्ही असणारच. त्यामुळे हे सरकार स्थिर नाही.

ठाणे : राज्य सरकारने सर्व्हे करून मराठा आरक्षणबाबत (Maratha Reservation) भूमिका बजावायला हवी होती. त्यासाठी केंद्र सरकारवर (Central Government) खापर फोडू नये. राज्यातील सरकार आणि उद्धव ठाकरे हे मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेऊ शकत नाही. आरक्षण रद्द झाले त्याला पुरे पूर राज्य सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यांच्या हातून काहीही होणार नाही, ते केवळ हात धुवायला सांगणार, अशा शब्दात नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. Marathas will not get reservation till Uddhav Thackeray is the Chief Minister .....

ठाणे येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, जोपर्यंत मराठा समाजाचा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा सिध्द करत नाही. तोपर्यंत राज्य सरकारला आरक्षणाचा प्रस्ताव पाठविण्याचा व मंजूर करण्याचा अधिकार पोहोचत नाही. आतपर्यंत दोन सर्व्हे झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले गेले. आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यामध्ये आरक्षण नाकारले गेले. का नाकारले याचे वकिलांनी उत्तर का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा : ज्या सुरेश गोरेंनी निवडून आणलं, त्यांच्याशीही शिवसेना सदस्यांनी इमान राखलं नाही

श्री. राणे म्हणाले, या आधी राणे कमिटीने मागासवर्गीयांचा सर्व्हे केला आहे. आता राज्य सरकारने सर्व्हे करून आरक्षणबाबत भूमिका बजावावी. त्यासाठी केंद्र
सरकारवर खापर फोडू नये हे सरकार आणि उद्धव ठाकरे हे मराठा समाजासाठी आरक्षण देण्याची भूमिका घेऊ शकत नाही. आरक्षण रद्द झाले त्याचा पुरे पूर जबाबदार राज्य सरकार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यांच्या हातून काहीही होणार नाही, ते केवळ हात धुवायला सांगतील, अशी टीकाही त्यांनी केली. मराठा समाजाची एकच संघटना तयार करा. त्यातून एकच आंदोलन करावे, जेणे करून सरकारला सरकार चालविणे कठीण होईल, त्यांना निर्णय घ्यावाच लागेल, अशी माझी अपेक्षा आहे.

आवश्य वाचा : विदेशातून लस मिळणे अशक्य, राज्याची मदार कोव्हॅक्सीन, कोव्हिशिल्डवरच..

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. याविषयी विचारले असता श्री.राणे म्हणाले, माणूसकी दृष्टीकोनातून त्यांनी भेट घेतली असेल कारण ते ज्येष्ठ नेते आहेत. ते आजारी आहेत, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेले असतील. या भेटीमुळे अनेकांची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे का, यावर श्री. राणे म्हणाले, त्यांनी औषध घ्यावे. राजकिय औषधे घ्यावीत. गोळ्या, इंजेक्शनस्‌ उपलब्ध आहेत.

मेट्रोच्या उद्‌घाटनास फडणवीस यांना बोलवण्यात आले नाही, या मागचे कारण काय असावे, या प्रश्नावर राणे म्हणाले, ज्यांना सरकार कसे चालवले जाते याची माहिती नाही, ज्ञान नाही. सुडबुध्दीने डावलायचं ही लोकशाही आहे. लोकशाही महाराष्ट्रात आजही आहे. भारतीय घटनेने दिलेल्या प्रोटोकॉलप्रमाणे फडणवीस यांना  बोलवायला पाहिजे होते. यामध्ये अधिकाऱ्यांसोबतच मुख्यमंत्र्यांचही सर्वात आधी चूक
आहे. त्यामुळे देवेंद्रजी गेले नाहीत. 
  
राज्यातील सरकार स्थिर आहे, असे तुम्हाला वाटते का, यावर श्री. राणे म्हणाले, रात्री झोपले की सकाळी उजाडेपर्यंत सरकार जाऊ शकते, अशी परिस्थिती या सरकारची आहे. हे तीन पक्षाचे सरकार आहे. रोज काँग्रेस म्हणते आम्ही चाललो, शिवसेना म्हणते आम्हाला सहकार्य मिळत नाही, आम्ही चाललो. पण राष्ट्रवादी म्हणते कोणाचेही सरकार आले तरी आम्ही असणारच. त्यामुळे हे सरकार स्थिर नाही. पण त्यामुळे सरकार असले तरी ते असल्यासारखे वाटत नाही. उलट सात वर्षे आमचा पंतप्रधान आहे.

देशात त्यांनी संरक्षण, कोरोना, शेतकऱ्यांबाबत सर्वसमावेश निर्णय घेऊन काम केले आहे. एक झुंजार व्यक्तीमत्व म्हणून त्यांची जगात ख्याती झाली आहे. सात वर्षे झाले म्हणून अभिनंदन करायला हवे. त्याऐवजी काही नेते लस मिळाली नाही बोंबलत आहेत. लॉकडाउनच्या मुद्द्यवर राणे म्हणाले, बघावं तेव्हा लॉकडाउन आणि मातोश्रीमध्ये बसण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उपसमारीची वेळ आलेली आहे. अनेक जण कोरोनामुळे दगावले आहे. यावर केंद्र सरकार काम करत नाही, असेच फक्त सांगत आहेत आणि स्वतः काम करत नसल्याचा आरोप श्री. राणे यांनी केला. पेट्रोल, डिझेलचे दर कमी व्हावेत, असे वाटते याबाबतची मागणी आम्ही केंद्राकडे केलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख