मराठा आरक्षण : संभाजीराजे छत्रपती घेणार राष्ट्रपतींची भेट 

मराठा आरक्षणाच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, यावेळी महाराष्ट्रातील सर्व पक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत आपले प्रतिनिधी म्हणून कोणास पाठवतात, याकडे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षण : संभाजीराजे छत्रपती घेणार राष्ट्रपतींची भेट 
Maratha reservation: Sambhaji Raje Chhatrapati to meet President

सातारा :मराठा आरक्षणाचा विषय राष्ट्रपतींकडे मांडण्यासाठी व समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती भवनाकडे पत्रव्यवहार करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरूवारी (ता. २ सप्टेंबर) रोजी भेटीची वेळ दिली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरून दिली आहे. Maratha reservation: Sambhaji Raje Chhatrapati to meet President

यावेळी खासदार संभाजीराजे यांनी आपल्यासोबत राष्ट्रपतींच्या भेटीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने त्यांचा एक खासदार प्रतिनिधी पाठवावा. यासाठी सर्व पक्षांच्या प्रमुखांना व गटनेत्यांना पत्र पाठवून आवाहन केले आहे. 

मराठा आरक्षणाच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, यावेळी महाराष्ट्रातील सर्व पक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत आपले प्रतिनिधी म्हणून कोणास पाठवतात, याकडे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in