गुटखा बंदी, वीजबिल माफीसाठी साताऱ्यात मनसे आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन - MANSE aggressive for electricity bill waiver in Satara; Protests in front of the Collector's Office | Politics Marathi News - Sarkarnama

गुटखा बंदी, वीजबिल माफीसाठी साताऱ्यात मनसे आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

शिक्षण संस्था सुरू नसताना शैक्षणिक शुल्काची शिक्षण संस्थांकडून वसुली सुरू झाली आहे. यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. तसेच जिल्ह्यात अवैधपणे गुटखा विक्री सुरू असून उत्पादनही होत आहे. त्यामध्ये गोरगरिब पानटपरी चालकांवर्र कारवाई होत आहे.

सातारा : कोरोना काळातील वीजबिले व शैक्षणिक फी माफ करावी,
इंधन दरवाढ रद्द करावी, जिल्ह्यात गुटखा बंदी करावी या मागण्यांसाठी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
केली. 

मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, कोरोनाकाळातील वीजबिल वसुलीसाठी विज वितरण कंपनीने तगादा लावला आहे.

तसेच शिक्षण संस्था सुरू नसताना शैक्षणिक शुल्काची शिक्षण संस्थांकडून वसुली सुरू झाली आहे. यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. तसेच जिल्ह्यात अवैधपणे गुटखा विक्री सुरू असून उत्पादनही होत आहे. त्यामध्ये गोरगरिब पानटपरी चालकांवर्र कारवाई होत आहे.

मुळात गुटखा उत्पादन करणाऱ्या कंपन्या वा डीलरवर मोक्का अंतर्गत कारवाई करून त्यांना अटक झाली पाहिजे. तरच अवैध गुटखा विक्री थांबणार आहे. येत्या आठ दिवसांत या मागण्यांबाबत शासनाने व जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनात राहूल शेडे, जितेंद्र वैराट, सौरभ झेंडे, दादा शिंगण, अश्विन गोळे, अमोल कांबळे, सागर भरगुडे, नितीन पार्टे, प्रशांत साळुंखे, अविष्कार पाटील, विशाल गोळे, संजय गायकवाड, विश्वास सोनवणे, विशाल माने, बाळासाहेब गायकवाड, रामदास तेली, मयुर नळ, राजेंद्र पवार, ओंकार पवार, ओंकार नाविलकर, शुभम विधाते आदी सहभागी झाले होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख