शिकाऱ्यांचा कर्दनकाळ महादेव मोहिते साताऱ्याचे नवे उपवनसंरक्षक : भारतसिंह हाडांची नागपुरला बदली  - Mahadev Mohite Satara's new Deputy forest Officer: Bharatsingh Hada transferred to Nagpur | Politics Marathi News - Sarkarnama

शिकाऱ्यांचा कर्दनकाळ महादेव मोहिते साताऱ्याचे नवे उपवनसंरक्षक : भारतसिंह हाडांची नागपुरला बदली 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

यापूर्वीही त्यांनी जिल्ह्यात काम केले आहे. त्या काळात त्यांनी वनातील शिकारींवर नियंत्रण ठेवले होते. त्यासाठी त्यांनी खबऱ्यांचे जाळे निर्माण केले होते. अनेक शिकाऱ्यांना जेरबंदही केले होते. त्यांच्या त्या खबऱ्यांच्या जाळ्याचा आताही त्यांनी निश्चित फायदा होणार आहे. 

कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यांची सातारा जिल्हा उपवनसंरक्षकपदी (प्रादेशिक) म्हणून नेमणूक झाली आहे. त्या पदावरील डॉ. भारतसिंह हाडा यांची नागपूर येथे बदली झाली आहे. 

श्री. मोहिते यांचा वन विभागातील कामांचा अभ्यास आहे. त्यांनी वेगवेगळ्या पदावरही काम केले आहे. श्री. मोहिते यांनी 2012 ते 2016 या कालावधीत सातारा येथे सहायक वनसरंक्षक पदावरही काम केले आहे. त्यांनतर श्री. मोहिते यांची पुणे येथे तर त्यानंतर 2018 नंतर आजअखेर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली विभागीय वनाधिकारी म्हणून काम केले. 

पूनर्वसनासह संरक्षण कार्यात त्यांनी चांगले काम केले आहे. श्री. मोहिते यांचे सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगांव हे मुळगाव आहे. चांदोली येथे व्याघ्र प्रकल्पात काम करताना श्री. मोहिते यांनी तीन वर्षात व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनासह पर्यटनाचा आराखडा आणि सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान स्थापन करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. चांदोली हेळवाक परिसरात पर्यटन वाढीसाठी त्यांनी दुर्गम भागात रस्ते तयार केले. 

त्याशिवाय वन्यजीवांची वाढ होण्यासाठी कुरण विकास कार्यक्रमही राबवला आहे. सध्या त्यांची जिल्हास्तरावरील उपवनसंरक्षपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वीही त्यांनी जिल्ह्यात काम केले आहे. त्या काळात त्यांनी वनातील शिकारींवर नियंत्रण ठेवले होते. त्यासाठी त्यांनी खबऱ्यांचे जाळे निर्माण केले होते. अनेक शिकाऱ्यांना जेरबंदही केले होते. त्यांच्या त्या खबऱ्यांच्या जाळ्याचा आताही त्यांनी निश्चित फायदा होणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख