महाबळेश्वरचा कायापालट वर्षभरात : नीलम गोऱ्हेंचा विश्वास  - Mahabaleshwar's transformation throughout the year: Neelam Gorhe's faith | Politics Marathi News - Sarkarnama

महाबळेश्वरचा कायापालट वर्षभरात : नीलम गोऱ्हेंचा विश्वास 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार दोन्ही सदनातील विरोधी पक्ष नेते, आघाडी सरकारमधील प्रमुख पक्षांचे गट नेते उपस्थित असतील. अर्थसंकल्पाबाबतचे महत्वाचे प्रस्ताव या अधिवेशनात सादर केले जातील. एकंदरीत कामकाजाचे स्वरूप या बिझिनेस ॲडव्हायजरी कमिटीच्या बैठकीत निश्चित होईल, असेही त्यांनी सांगितले. 

महाबळेश्वर : राज्यातील मोठया प्रश्नांबरोबरच स्थानिक पातळीवरील प्रश्नही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तितकेच लक्ष देऊन सोडवित आहेत. याचे उदाहरण म्हणजे महाबळेश्वर येथील वेण्णालेक व बाजारपेठेच्या सुशोभिकरणासाठी त्यांनी 100 कोटींचा निधी मंजुर केला आहे. सुशोभिकरणाचा आराखडाही तयार केला असुन एका वर्षात महाबळेश्वर शहराचा कायापालट झालेला सर्वांना दिसेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाबळेश्वरमध्ये बोलताना व्यक्त केला.

दरम्यान, येत्या तीन महिन्यात पुण्याचे विधानभवन सुरू करण्यात येणार असुन या विधानभवनाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील बळीराजाला होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  महाबळेश्वरात आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातुन आता सावरत असून लसीकरणासही प्रारंभ झाला आहे. राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिक सक्षमपणे लक्ष देत आहेत.

कोरोना काळात आरोग्य व्यवस्था सांभाळताना केंद्र व राज्य सरकार यांनी जनतेला योग्य प्रकारे धान्य पुरवठा केला. त्यामुळे उदयोगधंदे बंद असतानाही कोठेही कोणाची उपासमार झालेली नाही. कोरोनामुळे ऑनलाईन धंद्यांना चालना मिळाली आहे. फळप्रक्रिया उदयोगांनाही आता सुगीचे दिवस आले आहेत.राज्यातील मोठया प्रश्नांबरोबरच स्थानिक पातळीवरील प्रश्नही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तितकेच लक्ष देऊन सोडवित आहेत.

याचे उदाहरण म्हणजे महाबळेश्वर येथील वेण्णालेक व बाजारपेठेच्या सुशोभिकरणासाठी त्यांनी 100 कोटींचा निधी मंजुर केला आहे. सुशोभिकरणाचा आराखडाही तयार केला असुन एका वर्षात महाबळेश्वर शहराचा कायापालट झालेला सर्वांना दिसेल. मुंबईनंतर आता नागपुर येथील विधानभवन सुरू करण्यात आले आहे. पूर्वी येथे हंगामी कामाकाज पाहिले जात होते. आता मात्र ते बारामहीने सुरू राहणार आहे.

त्याचप्रमाणे पुण्याचे विधानभवन सुरू करण्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनीही मान्यता दिली आहे. येत्या तीन महिन्यात पुण्याचे विधानभवन सुरू करण्यात येणार असुन या विधानभवनाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील बळीराजाला होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. एक मार्चपासुन सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची बिझनेस ॲडव्हायजरी कमिटीची बैठक होणार आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार दोन्ही सदनातील विरोधी पक्ष नेते, आघाडी सरकारमधील प्रमुख पक्षांचे गट नेते उपस्थित असतील. अर्थसंकल्पाबाबतचे महत्वाचे प्रस्ताव या अधिवेशनात सादर केले जातील. एकंदरीत कामकाजाचे स्वरूप या बिझिनेस ॲडव्हायजरी कमिटीच्या बैठकीत निश्चित होईल, असेही त्यांनी सांगितले. 
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख