महाबळेश्वरला होणार जंगल सफारीची सोय....

महाबळेश्वर हे राज्यातील नामांकित थंड हवेचे ठिकाण आहे. पर्यटनावरच हे पर्यटन स्थळ अवलंबुन आहे. येथे पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या पॅनेलवर असलेले नागपुर येथील आर्किटेक्ट अशफाक मोहंमद यांनी महाबळेश्वरची पाहणी केलेली आहे.
Mahabaleshwar to have jungle safari facility Say Deputy Conservator of forest Mahadev Mohite
Mahabaleshwar to have jungle safari facility Say Deputy Conservator of forest Mahadev Mohite

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथे चोहो बाजुंनी सदाहरीत घनदाट जंगल आहे. हे जंगल पाहण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु वन विभागाच्या नियामांमुळे जंगलात जाऊन जंगलाची सफर करणे शक्य होत नाही. मात्र, आता ही सुविधा वन विभागाच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. जंगलातील राईडची दुरूस्ती करून गाईडसह पर्यटकांना आता जंगलाची सफर करून जंगल व जंगलातील प्राणी पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली आहे. Mahabaleshwar to have jungle safari facility Say Deputy Conservator of forest Mahadev Mohite
 
नुतन उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहावर संयुक्त वनव्यवस्थापन महासमिती व वन विभागातील विविध अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  ते म्हणाले, महाबळेश्वर हे राज्यातील नामांकित थंड हवेचे ठिकाण आहे. पर्यटनावरच हे पर्यटन स्थळ अवलंबुन आहे. येथे पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या पॅनेलवर असलेले नागपुर येथील आर्किटेक्ट अशफाक मोहंमद यांनी महाबळेश्वरची पाहणी केलेली आहे.

ते काही नवीन योजना सुचवितात का, या बाबत यांच्याशी व्हिसीव्दारे चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. ऑर्थरसीट येथे काचेची प्रेक्षा गॅलरी तयार करता येईल का, किंवा परदेशातील धरतीवर काही नवीन प्रोजेक्ट तयार करता येतो का, हे पाहिले जाणार आहे. हेलन पॉईंट, बॅबिंग्टन पॉईंटसारखे दुर्लक्षित पॉंईंटचा विकास करण्यात येणार आहे. गव्यांचे प्रमाण वाढले आहे. गवे हे मानवी वस्तीत येऊ नयेत, यासाठी जंगलातच गवताचे कुरण विकसीत करून ते त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्याच प्रमाणे वनप्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्यात येणार आहेत. वन विभागाच्या ताब्यातील शासकिय विश्रामगृहाच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च हा वन समितीच्या वतीने केला जातो. परंतु त्यांना यापासुन काही उत्पन्न मिळत नाही. म्हणुन ही सर्व शासकिय विश्रामगृह चालविण्यासाठी वन समितीकडे हस्तांतर करण्यात येणार आहेत. जंगलातील पाऊलवाटा व अस्तित्वात असलेले रस्ते यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी पर्यटकांसाठी टॉयलेट बांधण्यात येतील. महाबळेश्वर शहर व परिसरात अनेक पॉइंट आहेत.

गेली दीड ते दोन वर्षे महाबळेश्वर लॉकडाउनमुळे बंद आहे. या काळात वन समित्यांचे उत्पन्न बंद झाले आहे. परंतु याच काळात काही पडझड झाली आहे. त्यांची दुरूस्ती तातडीने करण्याची आवश्यक्ता आहे. त्याच प्रमाणे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक कठडे अथवा रेलिंग बांधण्यात येणार आहेत. वन विभागाचे अनेक ठिकाणी वाहनतळ आहेत. त्याचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात येणार आहे. महाबळेश्वर येथे चोहो बाजुंनी सदाहरीत घनदाट जंगल आहे. हे जंगल पाहण्याची अनेकांची इच्छा असते.

परंतु वन विभागाच्या नियामांमुळे जंगलात जाऊन जंगलाची सफर करणे शक्य होत नाही. मात्र, आता ही सुविधा वन विभागाच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. जंगलातील राईडची दुरूस्ती करून गाईडसह पर्यटकांना आता जंगलाची सफर करून जंगल व जंगलातील प्राणी पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. हिरडा विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत या बैठकीत संयुक्त वनव्यवस्थापन महासमिती यांच्या वतीने अनिल भिलारे यांनी उपवन संरक्षक महादेव मोहिते यांचे
स्वागत केले. तर, विजय भिलारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीला वनक्षेत्रपाल दिलीप झगडे, वन व्यवस्थापन समितीचे शांताराम धनावडे , विलास मोरे, पंढरीनाथ लांगी, कादर सय्यद, नाना वाडेकर, रमेश चोरमले, विष्णु भिलारे, विलास भिलारे, धनंजय केळगणे, संजय केळगणे आदी उपस्थित होते.

'रोप वे' साठी मुख्यमंत्री आग्रही....
लॉडविक पॉईंट ते प्रतापगड रोप वे हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आग्रही आहेत. या प्रकल्पातील सर्व अडथळे दुर करून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी वन विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. महाबळेश्वरसाठी जो 100 कोटींचा निधी राज्य शासनाने मंजुर केला आहे. त्यापैकी काही रक्कम ही वन विभागाकडे देखील येणार आहे. त्या रक्कमेतून पर्यटकांसाठी काही प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. अशा प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली असुन हे प्रस्ताव लवकरात लवकर राज्य शासनाकडे सादर केले जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com