वाझे प्रकरण लपविण्यासाठीच लॉकडाऊन; राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली तुडविले असते..... - Lockdown just to hide the Vaze case says MP Udayanraje | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

वाझे प्रकरण लपविण्यासाठीच लॉकडाऊन; राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली तुडविले असते.....

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

लॉकडाऊन हटविले नाही तर मी एखादा दिवस वाट बघेन. अन्यथा महाराष्ट्रातील जनतेला माझे आवाहन आहे. वाझे प्रकरण हे धुळफेक असून हे प्रकरण लपविण्यासाठीच लॉकडाऊन केले आहे. वाझेकडचे पैसे घ्या, अन्‌ लोकांना वाटा. आता लॉकडाऊन पुढाऱ्यांचे करा, असा सल्लाही त्यांनी दिला. 

सातारा : कधीही लॉकडाऊन करायला तुमच्या बापाची इस्टेट आहे का, असा प्रश्न करत लसीचा पुरवठा व्यवस्थित करू शकत नाहीत आणि वर पैसेही खातात. वाझे प्रकरणात कोणाला किती पैसे पोहोच झाले हे समजले पाहिजे. लोकांनी आता याचा विचार केला पाहिजे. राजेशाही असती तर मी या सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडविले असते. स्वतः जगले पाहिजेत, पण लाख मेले तरी चालतील, अशी राज्यातील सरकारची परिस्थिती आहे. वझेला सगळ्या प्रकारचे संरक्षण दिले जाते. त्याच्याकडे असलेले पैसे घ्या आणि लस विकत घ्या, असा सल्ला साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला दिला.

उदयनराजे भोसले यांनी आज लॉकडाऊच्या निषेधार्थ साताऱ्यातील पोवई नाका येथील एका आंब्याच्या झाडाखाली 'भीक मांगो' आंदोलन केले. यावेळी या अनोख्या आंदोलनामागची त्यांची भूमिका पत्रकारांनी जाणून घेतली. ते म्हणाले, अशा प्रकारे आंदोलन करण्याची माझ्यावर वेळ आली. तर गोरगरिब ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांची काय अवस्था असेल. या आंदोलनातच सर्व ताकत आहे.

पण येथे प्रश्न ताकतीचा नसून इच्छा शक्तीचा आहे. या राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीच नाही. आपल्याकडे लोकशाही आहे, राजेशाही असतील तर या सगळ्यांना जवळपास ही पोहोचून दिली नसती. त्यांनी ढिगाने पैसे खाल्ले मग लसीकरणाला का पैसे मिळत नाहीत. ज्यांना लस मिळाली ते आता कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. हा बाजार या बाजार बुणग्यांणी मांडला आहे. कोण हा वाझे, त्याच्याकडे ऐवढे पैसे आले कोठून हेच मला समजत नाही. 

पैसे किती खायचे तेवढे खावा. खाली पडतंय तरी खाताय. सिमेंटच्या घरात राहत राहणारी ही मंडळी गोरगरिबांचे नुकसान करत आहेत. आजपर्यंत कोणत्याही शास्त्रज्ञांनी लॉकडाऊनबाबत वक्तव्य केलेले नाही. शास्त्रज्ञांनी सांगीतले तरच लॉकडाऊन करा. तुमचे काळे कारनामे लपविण्याकरिता लॉकडाऊन करता का. पत्र्याच्या शेडमध्ये राहतात त्यांची अवस्था काय आहे. पोलिस त्यांनाच आडवतात. उन्हाळा वाढलाय म्हणून बाहेर बसले की पोलिस दांडकी मारतात.

त्यांना कोणी अधिकार दिलेत. एसपींपासून आयजीपर्यंत सर्व पोलिसांना माझे सांगणे आहे आम्ही टॅक्स भरतो म्हणून तुमचे पगार होतात. तुम्ही शासनाचे नोकर आहात. कधीही लॉकडाऊन करायला तुमच्या बापाची इस्टेट आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. लसीचा पुरवठा व्यवस्थित करू शकत नाहीत आणि वर पैसे खातात. वाझे प्रकरणात कोणाला किती पैसे पोहोच झाले हे समजले पाहिजे.

लोकांनी आता याचा विचार केला पाहिजे. राजेशाही असती तर मी या सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडविले असते. एक मेला तर चालेल पण लाख जगले पाहिजेत. पण त्यांना ते स्वतः जगले पाहिजे, लाख मेले तरी चालेल, अशी राज्यातील परिस्थिती आहे. वझेला सगळ्या प्रकारचे संरक्षण दिले जाते. त्याच्याकडे असलेल पैसे घ्या आणि लस विकत घ्या, असा सल्लाही उदयनराजेंनी दिला. 

सगळ्या दुकानदारांना आरटीपीसीआर व ॲन्टीजेन टेस्ट सक्तीचे केली आहे. त्याचे पैसे कोण देणार, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, मी व्यापाऱ्यांच्या बाजून बोलत नाही. सर्वसामान्यांच्यावतीने बोलत आहे. त्यांच्याकडे आज उदरनिर्वाहाचे साधन नाही. जिल्हा प्रशासन स्वतःला लय शहाणं समजत आहे. तुम्हाला बुध्दी दिली की नाही माहित नाही. पण उदयनराजेंना बुध्दी आहे. या सर्वांना माझ्या ताब्यात द्या मी सगळे नियोजन करतो. 

लॉकडाऊन हटविले नाही तर मी एखादा दिवस वाट बघेन. अन्यथा महाराष्ट्रातील जनतेला माझे आवाहन आहे. वाझे प्रकरण हे धुळफेक असून हे प्रकरण लपविण्यासाठीच लॉकडाऊन केले आहे. वाझेकडचे पैसे घ्या, अन्‌ लोकांना वाटा. आता लॉकडाऊन पुढाऱ्यांचे करा, असा सल्लाही त्यांनी दिला. 
सगळे बंद करून टाकल्यामुळे गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कशाकरिता तुमच्या बापाची इस्टेट आहे का. पोलिस व जिल्हा प्रशासन याचे उत्तर देऊ शकत नाहीत.

उदयनराजेंचा पोलिसांचा इशारा....

मी परखड पणे बोलतो कारण माझा जीव तुटतो आहे. याद राखा एका पोलिसांनी कोणाला काठी मारली तर देवा शपथ सांगातो कायदा व  सुव्यवस्थेची परिस्थिती जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात निर्माण होईल. त्यामुळे लोकांनो कोणाला घाबरू नका. मी पोलिसांचा आदर करतो पण त्यांनी काय पण करावे, हे योग्य नाही. त्यांची ताकद झीरो आहे. मानले तर देव नाही तर दगड म्हणतात. हजार लोकांनी एका पोलिसांना धरले आणि चापडले तर हाडे तरी दिसतील का. पोलिसांनी मारले तर सोडून नका, मी पण सोडणार नाही. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख