साताऱ्याजवळ ऑक्‍सिजन टॅंकरला गळती; दुरुस्तीनंतर कोल्हापुरकडे रवाना

टॅंकरला वाढेफाटा परिसरात महामार्गावर गळती लागली. टॅंकरच्या पाठीमागील बाजूने पांढऱ्या धुराचे लोट उसळू लागल्याचे लक्षात आल्यानंतर टॅंकर चालकाने याची माहिती पोलिसांना दिली. यानुसार पोलिसांनी आवश्‍यक त्या उपाययोजना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार राबवत गळती थांबविण्यासाठी तज्ञांना त्याठिकाणी पाचारण केले.
Leakage of oxygen tanker near Satara; Departed for Kolhapur after repairs
Leakage of oxygen tanker near Satara; Departed for Kolhapur after repairs

सातारा : कोल्हापुरकडे लिक्‍विड ऑक्‍सिजन (Liquid Oxygen) घेवून निघालेल्या टॅंकरला आज सायंकाळी पाचच्या सुमारास साताऱ्याजवळील वाढेफाटा परिसरात अचानक गळती लागली. टॅंकरला गळती लागल्याचे समजताच जिल्हा प्रशासनाने यंत्रणा गतीमान करत गळती थांबविण्याचे काम पूर्ण केले. यानंतर हा टॅंकर कोल्हापुरकडे सुरक्षित रवाना करण्यात आला. (Leakage of oxygen tanker near Satara; Departed for Kolhapur after repairs)

कोरोनाची बाधा झाल्याने अत्यवस्थ बनलेल्या रुग्णांना ऑक्‍सिजन पुरवठा करण्यात येतो. सध्या ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने उपलब्ध होईल, त्याठिकाणाहून लिक्‍विड ऑक्‍सिजन टॅंकरव्दारे आणण्यात येत आहे. असाच एक टॅंकर पेण येथून लिक्‍विड ऑक्‍सिजन घेवून कोल्हापुरकडे निघाला होता. 

या टॅंकरला वाढेफाटा परिसरात महामार्गावर गळती लागली. टॅंकरच्या पाठीमागील बाजूने पांढऱ्या धुराचे लोट उसळू लागल्याचे लक्षात आल्यानंतर टॅंकर चालकाने याची माहिती पोलिसांना दिली. यानुसार पोलिसांनी आवश्‍यक त्या उपाययोजना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार राबवत गळती थांबविण्यासाठी तज्ञांना त्याठिकाणी पाचारण केले. या तज्ञांनी गळती काढण्याचे काम पूर्ण केल्यानंतर तो टॅंकर पुन्हा सुरक्षित कोल्हापुरकडे मार्गस्थ करण्याच्या हालचाली रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून सुरु होत्या. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com