जिल्हाधिकारी, आयुक्तांना मॅनेज करून खादी ग्रामोद्योगची जागा बळकावली.... - The land of Khadi Gamudyog Corporation has been seized by managing the Collector and Commissioner says Pravin Darekar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

जिल्हाधिकारी, आयुक्तांना मॅनेज करून खादी ग्रामोद्योगची जागा बळकावली....

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 4 मार्च 2021

एकनाथ शिंदेकडे पाहून ते म्हणाले, मुंबई पालिकेच्या परिसरातील  नगरविकासच्या जागांचा आढावा घ्या, माढाच्या जागा कुठे आहेत, जिल्हाधिकाऱ्यांच्या जागा कुठल्या, पर्यटन विकासच्या जागा कुठल्या याची सर्वंकक्ष माहिती घेऊन एक बैठक घेऊन मोकळ्या जागा किती, अतिक्रमिती जागा याची माहिती घ्या.

सातारा : शासकिय जागा बळकावण्याचा प्रकार राज्यात सुरू आहे. बोरिवली येथील खादी ग्रामोद्यागची २५ एकर जागा महसूलचे जिल्हाधिकारी व आयुक्तांना मॅनेज करून गणेश नायडू हडप करतो. या जागेवर गरब्याचे कार्यक्रम घेऊन तो तीन ते चार कोटी रूपये कमवत आहे. तोच पुढे खादी ग्रामोद्योगचा संचालक झाला, असा गौप्यस्फोट विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेच्या सभागृहात केला. त्यामुळे सरकारने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी अतिक्रमित जागा ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी मंत्री शंभूराज देसाई व अर्थमंत्री यांना केली. 

कोरोनाच्या काळात महाराष्ट्राचे कमी झालेले उत्पन्न वाढविण्याच्या मुद्द्यावर बोलताना शासकिय जागांवर झालेल्या अतिक्रमाणाकडे त्यांनी सभागृहाचे  लक्ष वेधले. दरेकर म्हणाले, कोरोनामुळे राज्याची आर्थिक अडचण झालेली आहे. त्याला कारण नियोजनाचा अभाव हेच आहे. महाराष्ट्र सर्वात समृध्द राज्य आहे. येथे शासकिय मालमत्ता इतर राज्याच्या तुलनेत जास्त आहे. पण राज्यातील विविध ठिकाणच्या शासकिय जागा बळकावण्यासाठीच असतात.

एकनाथ शिंदेकडे पाहून ते म्हणाले, मुंबई पालिकेच्या परिसरातील  नगरविकासच्या जागांचा आढावा घ्या, माढाच्या जागा कुठे आहेत, जिल्हाधिकाऱ्यांच्या जागा कुठल्या, पर्यटन विकासच्या जागा कुठल्या याची सर्वंकक्ष माहिती घेऊन एक बैठक घेऊन मोकळ्या जागा किती, अतिक्रमिती जागा याची माहिती घ्या. त्यातून काही हजर कोटींचे उत्पन्न मिळेल. बोरिवली येथील खादी ग्रामोद्योगची २५ एकर जागा आहे. तिची सध्याच्या बाजारभावाप्रमाणे २० हजार कोटी रूपये किंमत होईल.

पण महसूलच्या जिल्हाधिकारी व आयुक्तांना मॅनेज करून ही २० हजार कोटींची जागा कोणी हडप केली, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ही जागा कोण वापरते आहे, असे सांगून ते म्हणाले, गणेश नायडू ही जागा वापरत असून या जागेवर गरब्याच्या कार्यक्रमातून तीन, चार कोटी तो कमवत आहे. गरब्याच्या तिकिटाची किंमत २५ हजार आहे. जो खुले पणे चालतो. शंभूराजे देसाई आपण ही बाबत गांभीर्याने घ्या.

मी तुम्हाला २० हजार कोटींची मदत करतोय. आतातर गणेश नायडू हा खादी ग्रामोद्योगचा संचालक झाला आहे. त्यामुळे या अतिक्रमीत जागा ताब्यात घ्या, असेही त्यांनी सांगितले. नरवीर तानाजी मालूसरेंच्या स्मारकासाठी पाच कोटी रूपये शंभूराज देसाई यांनी दिले. पण प्रत्यक्ष प्रस्ताव आलेला नाही. तानाजी मालूसरेंच्या जन्मभूमिचे तातडीने सुशोभीकरण करावे, असेही त्यांनी सांगितले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख