कृष्णा कारखान्यासाठी 29 जूनला मतदान,  उद्यापासून अर्ज भरण्यास सुरवात - Krishna factory election program announced; Application starts from tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

कृष्णा कारखान्यासाठी 29 जूनला मतदान,  उद्यापासून अर्ज भरण्यास सुरवात

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 24 मे 2021

कऱ्हाड, वाळवा तालुक्यात सर्वाधिक सभासद आहेत. कृष्णाचे निवडणुक निर्णय अधिकारी आष्टेकर यांनीही दिलेल्या प्रस्तावत फेरबदल करून निवडणुक प्राधिकरणाने कार्यक्रम जाहीर केला. श्री. आष्टेकर म्हणाले, कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. त्यासाठी उद्यापासून (मंगळवार) अर्ज भरण्यास प्रारंभ आहे. 

कऱ्हाड ः सातारा व सांगली (Satara-Sangli) जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या (Krishna Sugar Factory) पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम  (Election Declared) आज (सोमवार) सायंकाळी जाहीर झाला. कारखान्यासाठी उद्यापासून (ता. 25) अर्ज भरण्यास सुरूवात आहे. कारखान्याचे 29 जूनला मतदान तर एक जुलैला मतमोजणी होईल. Krishna factory election program announced; Application starts from tomorrow

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिंबधक प्रकाश आष्टेकर यांची यापूर्वी नियुक्ती झाली आहे. कऱ्हाडचे उपनिबंध मनोहर माळी, कोरोगावचे संजय सुद्रीक व महाबळेश्वरचे जे. पी. शिंदे सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून म्हणून काम पाहणार आहेत. जिल्हा निबंधक आष्टेकर यांनी कृष्णाच्या निवडणुक प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव निवडणूक प्राधिकरणाकडे दिला होता. त्याला आज सायंकाळी मंजूरी मिळाली आहे. 

हेही वाचा : पुणेकरांना दिलासा : नव्या रूग्णांचा आकडा पाचशेच्या खाली

त्यामध्ये उद्यापासून (मंगळवारपासून) अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. शासकीय सुट्टीचे दिवस वगळून अर्ज भरण्यास परवानगी आहे. त्यामुळे उद्याचा मंगळवार, त्यानंतर गुरूवार, शुक्रवार व पुढचा सोमवार व मंगळवार असे मोजके पाचच दिवस अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानंतर दाखल अर्जांची दोन जूनला छाननी होईल. तीन ते 17 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. उमेदवारांची अंतिम यादी 18 जूनला जाहीर होणार आहे.

आवश्य वाचा : पंतप्रधानांनी महाराष्ट्राला मदत टाळणे हा अन्यायच!

त्यानंतर 29 जूनला मतदान तर एक जुलैला मतमोजणी होणार आहे. 
सातारा व सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्रातील कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या पक्क्या याद्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाल्या. त्यात 47 हजार 160 सभासदांची अंतिम यादी जाहीर झाली. अक्रियाशील 820 सभासदांचा यादीत समावेश आहे.

कऱ्हाड, वाळवा तालुक्यात सर्वाधिक सभासद आहेत. कृष्णाचे निवडणुक निर्णय अधिकारी आष्टेकर यांनीही दिलेल्या प्रस्तावत फेरबदल करून निवडणुक प्राधिकरणाने कार्यक्रम जाहीर केला. श्री. आष्टेकर म्हणाले, कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. त्यासाठी उद्यापासून (मंगळवार) अर्ज भरण्यास प्रारंभ आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख