जिल्हा बँकेच्या ठरावावरून पानवणच्या सरपंचाच्या पतीचे अपहरण

गाडीच्या मागील सीटवर ॲसिड सांडल्याचे निदर्शनास आले. परंतु डॉ. शिंदे यांचा शोध लागू शकला नाही. त्यामुळे म्हसवड पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणूकीवरून माण तालुक्यात राजकारण पेटले आहे.
Kidnapping of Panwan Sarpanch's husband fot District Bank resolution
Kidnapping of Panwan Sarpanch's husband fot District Bank resolution

म्हसवड/ सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या ठरावावरून म्हसवड येथील पानवण गावातील डॉ.नाना शिंदे यांचे अपहरण झाल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. नाना शिंदे यांच्या पत्नी या गावच्या नवनिर्वाचित सरपंच आहेत. त्यामुळे या घटनेला राजकीय पार्श्वभूमी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

म्हसवड तालुक्यातील पानवण गावात असणाऱ्या शेतात काल संध्याकाळी शेतीच्या कामानिमित्त गेलेले डॉ. नाना शिंदे रात्री उशीरापर्यंत परत आले नसल्याने घरच्या लोकांनी शोध शोध केली. यामध्ये शेतालगत असणाऱ्या रस्त्यावर त्यांची चारचाकी गाडी आढळली.

त्या गाडीची तोडफोड झालेली होती. तसेच गाडीच्या मागील सीटवर ॲसिड सांडल्याचे निदर्शनास आले. परंतु डॉ. शिंदे यांचा शोध लागू शकला नाही. त्यामुळे म्हसवड पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणूकीवरून माण तालुक्यात राजकारण पेटले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com