शिवसेनेचे नेते शेखर गोरेंसह सहा जणांवर म्हसवड पोलिसात अपहरणाचा गुन्हा

जिल्हा बँकेची निवडणूक स्थगित झाली असली तरी माण तालुक्यात सोसायटीतून झालेल्या ठरावातून राजकारण रंगले आहे. यातूनच ठराव केलेल्या व्यक्तींच्या अपहरणाचा प्रकार झाल्याचे उघडकीस येत आहे.
Kidnapping case Mhaswad police have registered a case against six persons, including Shekhar Gore.
Kidnapping case Mhaswad police have registered a case against six persons, including Shekhar Gore.

म्हसवड : सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे माण तालुक्यात वातावरण खुपच तापू लागले असुन बँकेच्या ठरावानंतर डॉ. नानासाहेब शिंदे यांच्या अपहरणाचा तपास करत असतानाच पोलिसांसमोर आणखी दोघांच्या अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. पानवण (ता. माण) येथील दोघांच्या अपहरणप्रकरणी शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिसांनी काल रात्री उशीरा गुन्हा नोंद केला आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक स्थगित झाली असली तरी माण तालुक्यात सोसायटीतून झालेल्या ठरावातून राजकारण रंगले आहे. यातूनच ठराव केलेल्या व्यक्तींच्या अपहरणाचा प्रकार झाल्याचे उघडकीस येत आहे. 

हा अपहरणाचा प्रकार कशासाठी करण्यात आले याचा तपास पोलिस करत आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पानवण (ता. माण) येथील धनाजी आबाजी शिंदे व त्यांचे मित्र छुब चव्हाण यांना गुरूवार (ता. 25 ) ते रविवार (ता. 28) च्या दरम्यान शेखर भगवान गोरे, राजेंद्र उर्फ राजू ब्रम्हदेव जाधव, संग्राम अनिल शेटे, दत्ता घाडगे, राहुल अर्जुन गोरे वीरकुमार पोपटलाल गांधी व गाडीवरील चालक हरिदास गायकवाड यांनी त्यांच्या ईनोवा गाडी (क्र. एमएच 11 - 7057) मधून जबरदस्तीने बसवून माण तालुक्यातील कुळकजाई येथील फार्म हाऊस तसेच ठाणे येथील लॉजवर थांबवून ठेवले होते.

याबाबत धनाजी आबाजी शिंदे यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार शेखर गोरे यांच्यासह एकूण सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास म्हसवड ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे करत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com