कऱ्हाडचे विमानतळ दोन दिवस अंधारात; विज वितरणचे दूर्लक्ष 

त्यासंदर्भात विमानतळ व्यवस्थापक कृणाल देसाई यांनी महावितरणशी संपर्क साधून त्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतरही काहीच कार्यवाही केलेली नाही. अतिमहत्त्वाचे ठिकाणी असूनही ते अंधारातच राहिल्याने आश्चर्यव्यक्त होत आहे.
Karad's airport in darkness for two days; Ignoring power distribution
Karad's airport in darkness for two days; Ignoring power distribution

कऱ्हाड : कराड येथील विमानतळ Karad airport हे अतिमहत्त्वाचे ठिकाण शुक्रवारपासून अंधारात आहे. येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यासंदर्भात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळवूनही त्यांनी वीजपुरवठा पूर्ववत केलेला नाही, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे कराडातील अतिमहत्त्वाचे ठिकाण दोन दिवसांपासून अंधारात असल्याने विज वितरणच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. Karad's airport in darkness for two days; Ignoring power distribution

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना कराडा येथे विमानतळ सुरू करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील ते एकमेव विमानतळ असून या विमानतळाचा मंत्री, खासदार, आमदार यांसह उद्योजक वापर करतात. सध्या या विमानतळावरून वाहतूक कमी असली, तरी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्याचा सातत्याने वापर झाला.

त्याचबरोबर हजारमाचीला होणारे भूकंप संशोधन केंद्र, पुणे- बंगळूर महामार्गाजवळ असणारे ठिकाण, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारे ठिकाण म्हणून कऱ्हाडची ओळख असल्याने श्री. चव्हाण यांनी विमानतळ विस्तारीकरणाचे प्रयोजन केले आहे. त्यामुळे येथील विमानतळ हे शासनाच्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणांच्या यादीत आहे. मात्र, हे ठिकाण दोन दिवसांपासून अंधारात आहे.

त्यासंदर्भात विमानतळ व्यवस्थापक कृणाल देसाई यांनी महावितरणशी संपर्क साधून त्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतरही काहीच कार्यवाही केलेली नाही. अतिमहत्त्वाचे ठिकाणी असूनही ते अंधारातच राहिल्याने आश्चर्यच व्यक्त होत आहे. कऱ्हाड विमानतळ अतिमहत्त्वाचे ठिकाण असूनही शुक्रवार दुपारपसून लाइट नाही. त्यासंदर्भात महावितरणला कळवूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. त्याची माहिती जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना पत्राद्वारे दिली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com