माझी वसुंधरा पुरस्कारात कराड पालिका राज्यात दुसरी - Karad Palika is second in the state in my Vasundhara award | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

माझी वसुंधरा पुरस्कारात कराड पालिका राज्यात दुसरी

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 5 जून 2021

 ग्रामपंचायत, नगरपंचायत, पालिका व महापालिका अशा स्तरावरील निकाल जाहीर झाला. त्यात कऱ्हाड पालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. मागील वर्षीही कऱ्हाड पालिका पहिल्या क्रमांकावर होती. या वर्षी स्पर्धेचे निकष बदलून झालेल्या स्पर्धेतही कऱ्हाड पालिकेला पहिल्या तीन क्रमांकात आपले नाव टिकवण्यात यश आले आहे.

कऱ्हाड : माझी वसुंधरा पुरस्कारात पालिका गटात 222 पालिकामध्ये कऱ्हाड पालिकेने राज्यात दुसऱ्या क्रमांकाला गवसणी घातली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियान पुरस्कार सोहळा आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. त्याच पद्धतीने त्याचे वितरणही झाले. मुंबई येथे ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम झाला. Karad Palika is second in the state in my Vasundhara award

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. कऱ्हाडहून नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील, जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, लोकशाही आघाडीचे गटनेते विनायक पावसकर, मुख्याधिकारी रमाकांते डाके यांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. 

हेही वाचा : लस टंचाई कमी करण्याचे दिशेने पाऊल; सिरमबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव सौ. मनिषा म्हैसकर यांनी सुत्रसंचालन केले. ग्रामपंचायत, नगरपंचायत, पालिका व महापालिका अशा स्तरावरील निकाल जाहीर झाला. त्यात कऱ्हाड पालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. मागील वर्षीही कऱ्हाड पालिका पहिल्या क्रमांकावर होती. या वर्षी स्पर्धेचे निकष बदलून झालेल्या स्पर्धेतही कऱ्हाड पालिकेला पहिल्या तीन क्रमांकात आपले नाव टिकवण्यात यश आले आहे.

कऱ्हाड पालिकेशिवाय हिंगोली पालिकेचा पहिला तर जामनेर (जि. जळगाव) पालिकेचा तिसरा क्रमांक आला आहे. निकाल जाहीर होताच पालिकेत कर्मचाऱ्यांनी आनंद साजरा करत फटाक्यांची आतषबाजी केली. कऱ्हाड पालिकेचा तिसरा क्रमांक आल्याने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचे पेढा भरवून नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी अभिनंदन करत आनंद व्यक्त केला. यावेळी पालिकेचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते. 

मलकापूरचेही यश 

नगरपंचयात गटाचे निकाल जाहीर झाले. त्यात कऱ्हाड तालुक्यातील मलकापूर पालिकेचा नगरपंचायत गटात तिसरा क्रमांक पटकवला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख