अलमट्टीवरून वाद टाळण्यासाठी जयंतरावांची आताच बांधबंधिस्ती! - Jayantarao's commitment now to avoid disputes from Almatti! | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

अलमट्टीवरून वाद टाळण्यासाठी जयंतरावांची आताच बांधबंधिस्ती!

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 19 जून 2021

ही बैठक दोन्ही राज्यात योग्य समन्वय साधण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या Almatti Dam पाण्याविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वय असावा. याकरिता जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी आज कर्नाटकाचे Karnataka मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री बी. एस. येडियुरप्पा S. Yediyurappa यांची बंगलूर येथे भेट घेऊन चर्चा केली. Jayantarao's commitment now to avoid disputes from Almatti!

यावेळी कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई Basavraj Bommai तसेच कर्नाटक राज्याचे मुख्य सचिव, तसेच जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजय कुमार गौतम व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान कृष्णा व भीमा नद्यासंदर्भात येणाऱ्या काळात पूराचे नियंत्रण कशापध्दतीने करता येईल आणि त्यात कोणत्या पध्दतीने दोन्ही राज्याने समन्वय ठेवायचा याची चर्चा झाली.

हेही वाचा : त्यांचा जन्मच टीका करण्यासाठी ! रोहित पवार यांचा पडळकर यांच्यावर प्रतिहल्ला

जलहवामान विषयक यंत्रणा...

महाराष्ट्राने रिअल टाईम डाटा अक्वीझिशन सिस्टीम (जलहवामान विषयक विनाविलंब माहिती मिळविण्याबाबतची यंत्रणा) बसवली आहे. मात्र कर्नाटक सरकारने ही यंत्रणा अजून बसवलेली नाही. कर्नाटकात ही यंत्रणा तयार झाली तर एकत्रित अलमट्टीची डायनाँमिकली लेवल कंट्रोल करणं शक्य होईल आणि एकंदर येणारा अलमट्टी धरणातील येवा आणि पुढे जाणारा येवा व महाराष्ट्रात पडणारा पाऊस या सगळ्यावर आपण प्रभावीपणे जर नियंत्रण ठेवले, तर कुठून किती पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती पातळी ठेवायची खास करुन अलमट्टीवर चांगलं नियंत्रण ठेवता येईल, अशीही चर्चा झाल्याचे श्री.पाटील यांनी स्पष्ट केले. ही बैठक दोन्ही राज्यात योग्य समन्वय साधण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अचूक नियोजन

२०१९ चा पूर लक्षात घेता, गतवर्षी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शन अचूक नियोजन झाले होते. यंदाही पश्चिम महाराष्ट्राला पूराचा तडाखा बसू नये यासाठी श्री. पाटील प्रयत्नशील आहेत. आजची भेटही पूर नियंत्रणाच्या नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख