जयंत पाटलांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट; महापूरादरम्यान सहकार्याबद्दल मानले आभार...

आज कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली.
जयंत पाटलांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट; महापूरादरम्यान सहकार्याबद्दल मानले आभार...
Jayant Patil meets Karnataka Chief Minister; Thank you for your cooperation during the flood ...

मुंबई : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली व मागील महिन्यात राज्यात आलेल्या  महापूरादरम्यान, कर्नाटक राज्याने केलेल्या सहकार्याबाबत आभार व्यक्त केले. Jayant Patil meets Karnataka Chief Minister; Thank you for your cooperation during the flood ...

दोन्ही राज्यातील धरणांच्या सुयोग्य नियोजनामुळे बऱ्याच मोठ्याप्रमाणावर होऊ पाहणारी जीवित व वित्तहानी टळली. येणाऱ्या काळातही दोन्ही राज्ये योग्य समन्वय साधतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

आज कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. येत्या १३ ते २० ऑगस्टदरम्यान, हवामान खात्याने (आयएमडी) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या विषयावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in