तर जयंत पाटील, शशीकांत शिंदेंना रस्त्यावरून फिरू देणार नाही.... - Jayant Patil and Shashikant Shinde will not be allowed to walk on the road says Dr. Dilip Yelgavkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

तर जयंत पाटील, शशीकांत शिंदेंना रस्त्यावरून फिरू देणार नाही....

आयाज मुल्ला
बुधवार, 28 जुलै 2021

''योजनेच्या अर्धवट पाइपलाइन व इतर कामासाठी आपल्या मागणीखातर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. योजना अनेक वर्षे लांबल्यामुळे योजनेचा खर्च वाढत गेला.’’ 

वडूज : जिहे-कठापूर पाणी उपसा सिंचन योजनेच्या पाण्याबाबत खटाव तालुक्यातील पूर्व भागाशी सापत्न भूमिका घेतल्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांना तालुक्यातील जनता रस्त्यावरून फिरू देणार नाही, असा इशारा माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. Jayant Patil and Shashikant Shinde will not be allowed to walk on the road says Dr. Dilip Yelgavkar

डॉ. येळगावकर म्हणाले, ''जिहे-कठापूर योजना ही निवृत्त अभियंता मंडळाने तयार केलेली आहे. माजी आमदार (कै.) कॅ. आर. डी. निकम यांनी माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून ही योजना तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार यांच्यापर्यंत पोचवली होती. १९९५ मध्‍ये राज्यात भाजप-शिवसेना युतीचे शासन आल्यानंतर या योजनेला खरी गती आली. 

हेही वाचा : आमदारांवरील खटले मागे घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

तत्कालीन पाटबंधारेमंत्री महादेव शिवणकर, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, मंत्री एकनाथ खडसे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष उदयनराजे भोसले, सदस्य गिरीष बापट यांच्यामार्फत आपण स्वत: पाठपुरावा केला आहे. त्यानंतर या योजनेला ११ फेब्रुवारी १९९७ रोजी प्रशासकीय मान्यता मिळून २६ हजार ९०७ कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही झाली. त्यानंतर निधीअभावी काही दिवस हे काम रखडले. 

आवश्य वाचा : एकेकाळी दोन खासदार असलेला पक्षही देशाचे नेतृत्व करत आहे!

आपण स्वत: आमदार असताना विधानसभा पायरीवर अधिवेशन काळात उपोषण केले. त्याची गांभीर्याने दखल घेवऊ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशन संपल्यानंतर काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे त्यांच्या व आपल्या स्वत:च्या उपस्थितीत कामही सुरू झाले. योजनेच्या अर्धवट पाइपलाइन व इतर कामासाठी आपल्या मागणीखातर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. योजना अनेक वर्षे लांबल्यामुळे योजनेचा खर्च वाढत गेला.’’ 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख