कमलनाथ यांच्यावर जावडेकरांची सडकून टीका
Javadekar's scathing criticism on Kamal Nath

कमलनाथ यांच्यावर जावडेकरांची सडकून टीका

कसोटीच्या काळात काँग्रेस कधीही जबाबदार विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसला नाही, असे सांगून जावडेकर म्हणाले की, भारतीय कोरोना हा शब्दप्रयोगच देशासाठी अत्यंत अपमानास्पद आहे. काँग्रेसलाच निराशेची लागण झाली आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी कोरोना संसर्गाला भारताशी जोडण्याचा केलेला प्रयत्न निंदनीय तर आहेच, पण हा भारताचा अपमान असून संसर्गाविरुद्ध चाललेल्या देशाच्या लढाईला कमजोर करण्याचा हीन राजकीय प्रयत्न आहे, असा हल्ला भाजपने चढविला आहे. काँग्रेस (Congress) नेते स्वतः निराशेच्या गर्तेत आहे. त्यामुळे त्यांना संसर्गाशी देशाने जी लढाई सुरू ठेवली त्यात सकारात्मक काहीच दिसत नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी केली आहे. (Javadekar's scathing criticism on Kamal Nath)

जागतिक आरोग्य संघटनेने, कोणत्याही देशाबरोबर कोरोना विषाणूचे नाव जोडले जाणार नाही, असे यापूर्वीच स्पष्ट केले असताना कमलनाथ यांनी भारतीय कोरोना सारखे अपमानास्पद शब्द वापरणे आणि तेवढ्यावर न थांबता भारताची ओळख मेरा भारत कोरोना अशी असल्याचे सांगणे बेजबाबदारपणाचे आहे. कमलनाथ यांच्याप्रमाणेच अनेक काँग्रेस नेत्यांनी ही अशीच शब्दावली वापरली आहे. त्यांच्या या भाषेबद्दल काँग्रेस नेतृत्वाने एक शब्दही न उच्चारणे अत्यंत निषेधार्ह आहे. 

काँग्रेस नेते स्वतः निराशेच्या गर्तेत आहेत त्यामुळे त्यांना संसर्गाशी देशाने जी लढाई सुरू ठेवली त्यात सकारात्मक काहीच दिसत नाही अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. कसोटीच्या काळात काँग्रेस कधीही जबाबदार विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसला नाही, असे सांगून जावडेकर म्हणाले की, भारतीय कोरोना हा शब्दप्रयोगच देशासाठी अत्यंत अपमानास्पद आहे. काँग्रेसलाच निराशेची लागण झाली आहे. 

यामुळे भारताच्या लढाईला कमकुवतपणा येतो. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्यूकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशीच्या आजाराबाबत राज्यांना मदत करावी, असे म्हटले आहे. मात्र भारताने आजारावरील औषधे विदेशातून मागवले आहेत आणि राज्यांना मागणीप्रमाणे पुरवठा ही केला जात आहे, असे जावडेकर म्हणाले.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in