राज्य सरकार खेळाडूंच्या पाठीशी; आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू

राज्यात विविध खेळांमध्ये खेळाडू निर्माण झाले पाहिजेत. त्यांचे भवितव्य सुरक्षित राहायला पाहिजे, यासाठी बालेवाडी- पुण्यात क्रीडा प्रबोधिनीत क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे.
राज्य सरकार खेळाडूंच्या पाठीशी; आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू
International standard sports university started: Sports Minister Sunil Kedar

फलटण शहर : प्रत्येक स्पर्धेमध्ये पदक मिळायलाच हवे असे नाही. ऑलिंपिकमध्ये प्रवीणला पदकाने हुलकावणी दिली असली, तरी कामगिरीच्या आधारे त्याने जनतेच्या हृदयात स्थान मिळविले आहे. यश हे सहजसाध्य होत नाही. राज्यातील खेळाडूंनी खेळावरच लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, राज्य शासन सर्व खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिली. International standard sports university started: Sports Minister Sunil Kedar

दरम्यान, पुढच्या ऑलिंपिकमध्ये नक्की पदक जिंकेल, असा विश्वास प्रवीण जाधव याने व्यक्त केला. ऑलिंपिकपटू तिरंदाज प्रवीण जाधव याच्या सरडे (ता. फलटण) येथील निवासस्थानी क्रीडा मंत्री केदार यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्या हस्ते प्रवीणचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार दीपक चव्हाण, डॉ. सुरेश जाधव, महेंद्र सूर्यवंशी- बेडके, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे उपस्थित होते. 

सरडे ते टोकियो ऑलिंपिक ही प्रवीणची वाटचाल ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी प्रेरणादायक आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने ऑलिंपिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली. आगामी ऑलिंपिक स्पर्धेत प्रवीण नक्की पदक प्राप्त करेल, असा विश्वास व्यक्त करून मंत्री केदार म्हणाले, ''क्रीडामंत्री म्हणून काम करताना या विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पूर्णतः वेगळा आहे.

राज्यात विविध खेळांमध्ये खेळाडू निर्माण झाले पाहिजेत. त्यांचे भवितव्य सुरक्षित राहायला पाहिजे, यासाठी बालेवाडी- पुण्यात क्रीडा प्रबोधिनीत क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे. तेथे खेळाडूंना विविध खेळांमधील वेगवेगळ्या पद्धतीचे व्यावसायिक प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येईल. त्यामुळे खेळाडू आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.'' 


फलटण येथे क्रीडा संकुल उभारण्याबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या माध्यमातून सर्व जण कार्यरत आहोत. फलटण येथे क्रीडा संकुल उभे राहण्यासाठी क्रीडा संचालनालयाच्या माध्यमातून जास्तीतजास्त निधी मंजूर करावा. 

- दीपक चव्हाण (आमदार, फलटण) 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in