पालिका सभापतींकडून अधिकारी, ठेकेदारास शिवीगाळ; गुन्हा दाखल करण्याची उदयनराजेंनी सूचना - Insults to officers, contractors from municipal chairpersons; Kind of serious attention from MP Udayanraje | Politics Marathi News - Sarkarnama

पालिका सभापतींकडून अधिकारी, ठेकेदारास शिवीगाळ; गुन्हा दाखल करण्याची उदयनराजेंनी सूचना

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 जून 2021

कोणाला शिवीगाळ करणे, अर्वाच्‍च भाषेत दम देणे, जीवे मारण्‍याची धमकी देणे चुकीचे आहे. नगरसेवक कोणत्‍याही पक्षाचा असू द्यात. पण, असे प्रकार चुकीचे आहेत. शासकीय कामात अडथळा आणल्‍यास विकासकामे रखडतील. यामुळे मी अभिजीत बापट यांना अशा कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्‍हा नोंद करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या आहेत.

सातारा : भुयारी गटर योजनेच्‍या ठेकेदारास अर्वाच्‍च भाषा वापरत सातारा पालिकेचे Satara Palika मुख्‍याधिकारी अभिजीत बापट Abhijit Bapat यांचा एकेरी उल्‍लेख केल्‍याची बांधकाम सभापती सिध्‍दी पवार  Shidhhi Pawar यांची एक ॲडिओ क्‍लिप आज व्‍हायरल झाली. या क्‍लिपची गंभीर दखल खासदार उदयनराजेंनी Udayanraje Bhosale घेत विकास कामांत अडथळा ‍आणणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्‍याच्‍या सुचना पालिका प्रशासनास दिल्‍या आहेत.  Insults to officers, contractors from municipal chairpersons; Kind of serious attention from MP Udayanraje

सातारा पालिकेने भुयारी गटर योजनेचे काम हाती घेतले असून सध्‍या हे काम मंगळवार पेठेतील विविध भागात सुरू आहे. या कामादरम्‍यान जेसीबीच्‍या धक्क्याने एका इमारतीच्‍या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले होते. हे नुकसान भरुन देण्‍याबाबात संबंधित ठेकेदाराने मान्‍य केले होते. पण या कामास विलंब होत असल्‍याने पालिकेच्या बांधकाम सभापती सिध्‍दी पवार यांनी मोबाईलवरून फोन करून ठेकेदारास त्‍याच्‍या सहकाऱ्यांना दमदाटी करत अर्वाच्‍च भाषा वापरली होती. 

हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाचा फॉर्म्यूला स्वीकारावा, अन् महायुतीमध्ये यावे…

याच दरम्‍यान, सौ. पवार यांनी पालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजीत बापट यांना उद्देशून एकेरी शब्‍द वापरत शिवीगाळ केली. या शिवीगाळीची ॲडिओ क्‍लिप आज सोशल मीडियावर व्‍हायरल झाल्‍याने सा‍ताऱ्यात खळबळ उडाली. या प्रकरणाची खासदार उदयनराजेंनी गंभीर दखल घेतली. त्‍यांनी या प्रकरणाची माहिती घेत या कामादरम्‍यान झालेले नुकसान भरुन देण्‍याचे ठेकेदाराने मान्‍य केले होते. अशी कामे होत असताना नुकसान होतेच.

आवश्य वाचा :  सरकार पडेल, ही अपेक्षा आता भाजपने बाळगू नये; नितीन राऊत यांचा टोला..

मात्र, त्‍यामुळे कोणाला शिवीगाळ करणे, अर्वाच्‍च भाषेत दम देणे, जीवे मारण्‍याची धमकी देणे चुकीचे आहे. नगरसेवक कोणत्‍याही पक्षाचा असू द्यात. पण, असे प्रकार चुकीचे आहेत. शासकीय कामात अडथळा आणल्‍यास विकासकामे रखडतील. यामुळे मी अभिजीत बापट यांना अशा कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्‍हा नोंद करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या आहेत. याच अनुषंगाने मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्‍याशी संपर्क साधला असता त्‍यांनी फोन उचलला नाही. 

गुन्‍ह्‍याचा माझ्‍यावर फरक पडणार नाही : सिद्धी पवार 

सातारकरांच्‍या भावना मी व्‍यक्‍त केल्‍या असून सुरू असणार्‍या कामाचा नागरीकांना प्रचंड त्रास होत आहे. माझे ते संभाषण एक तारखेचे आहे. ते व्‍हायरल केल्‍याने नागरीकांना माझ्‍या कामाची पध्‍दत आणि त्‍यांच्‍याविषयी असणारा कळवळा दिसून येतो. क्‍लिप व्‍हायरल करणार्‍यांना मी धन्‍यवाद देत असुन लोकहितासाठी कितीही गुन्‍हे दाखल झाले तरी त्‍याचा काहीही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी नोंदवली. 

त्या म्हणाल्या, मी जे बोलले ते भावनेच्‍या भरात आणि नागरीकांच्‍या प्रेमापोटी बोलले आहे. माझी भाषा आक्रमक आहे आणि ती मला मान्‍य आहे. लोक मला कामाबाबत विचारतात. मी हे काम दिवाळीनंतर करा असे पत्र दिले होते, मात्र त्‍याला केराची टोपली दाखविण्‍यात आली. नेत्‍यांनी माझ्‍यावर गुन्‍हा दाखल करायला सांगितले आहे. त्‍यांचा प्रत्‍येक शब्‍द मी मानते. माझे बोलणे गुन्‍हा असेल तर काम चार वर्षे रखडवले त्‍यांच्‍यावर का गुन्‍हा दाखल होत नाही, कशाची वाट बघताय, असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्‍थित केला. मी मुग गिळून गप्‍प बसणार नाही, मी नागरीकांच्‍या प्रश्‍‍नावर बोलणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख