पोलिसांनी केलेला अपमान सहन झाला नाही, अन् त्याने मृत्यूला कवटाळले - The insult from the police was not tolerated, he finally embraced death | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

पोलिसांनी केलेला अपमान सहन झाला नाही, अन् त्याने मृत्यूला कवटाळले

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021

चित्रा वाघ म्हणाल्या, ''दोन बीट मार्शल त्याच्या घरी गेले आणि महेशला गंभीर स्वरूपाची मारहाण करण्यात आली आणि ही मारहाणही कशासाठी तर आम्ही कॉल केला असता, तू तो रिसीव्ह का केला नाही, येवढ्या लहानशा गोष्टीसाठी.

नागपूर : नागपूर शहरातील महेश राऊतने एका गतीमंदाला मदत मिळवून देण्यासाठी पोलिस कंट्रोल रुम १०० ला कॉल केला. थोड्यावेळाने पोलिसांना त्याला कॉल बॅक केला. त्यावेळी त्याने कॉल रिसीव्ह केला नाही, किंवा त्याच्याकडून कुण्या कारणाने कॉल रिसीव्ह केला गेला नसेल. येवढ्या लहानशा कारणावरून पोलिसांना घरी जाऊन त्याला मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने त्याने मृत्यूला कवटाळले. हा नागपूर पोलिसांचा नीचपणाचा कळस असल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला. The insult from the police was not tolerated, he finally embraced death

चित्रा वाघ म्हणाल्या, ''दोन बीट मार्शल त्याच्या घरी गेले आणि महेशला गंभीर स्वरूपाची मारहाण करण्यात आली आणि ही मारहाणही कशासाठी तर आम्ही कॉल केला असता, तू तो रिसीव्ह का केला नाही, येवढ्या लहानशा गोष्टीसाठी. हे सर्व महेशच्या घरातील लोकांनी सांगितले. त्याच्या घराजवळ राहणाऱ्या लोकांनीही सांगितले. महेश राऊत लेखापाल म्हणून काम करीत होते. राऊत कुटुंब हे अतिशय सामान्य आहे. बीट मार्शलनी त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्या लोकांसमोर, शेजाऱ्यापाजाऱ्यांसमोर मारहाण केली. हे शल्य महेशला सहन झाले नाही आणि त्यांनी मृत्यूला कवटाळले. 

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या नावाने असलेल्या स्टेडियमचंही नाव बदलणार?

आता पोलिस म्हणत आहेत की, महेशचा त्यांच्या बायकोशी वाद झाला आणि त्या वादात त्यांना आत्महत्या केली. स्वतःचे पाप लपवण्यासाठी पोलिस खोट्यानाट्या गोष्टी पसरवत आहेत. आज त्याच्या घरची परिस्थिती गंभीर आहे. त्याची दोन लहान लहान मुलं आहेत. त्याची पत्नी धक्क्यातून सावरलेली नाही. या सर्व प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर आज पोलिस आयुक्तांची भेट घेतली. या प्रकरणात अजून कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. कोणाला निलंबित करणे तर दूरच पण साधी कारवाईही झाली नसल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. 

काय होते प्रकरण...

पोलिस नियंत्रण कक्षाला फेक कॉल केल्याचा ठपका ठेवत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी महेश राऊतला घरातून खेचून बाहेर सर्वांसमोर मारहाण केली होती. पोलिसांच्या मारहाणीमुळे अपमानित झालेल्या युवकाने विषप्राशन करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी हुडकेश्‍वरमध्ये उघडकीस आली. या घटनेमुळे मृतांच्या संतप्त नातेवाईकांसह नागरिकांनी मंगळवारी सकाळी हुडकेश्वर पोलिस स्टेशनला घेराव घातला होता. 

आवश्य वाचा : मनसे आणि भाजप एकत्र आले तर आनंदच : मनसेच्या नेत्याची महत्वपूर्ण प्रतिक्रिया
 
तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास महेश राऊत याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. एका गतीमंद मुलाला शेजारची महिला मारहाण करीत असल्याचे त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला सांगितले. माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिस स्टेशनचे चार्ली कमांडो किशोर सेनाड व प्रवीण आलम तेथे गेले. मात्र, मारहाणीची कोणतीही घटना झाली नसल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी महेशच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. महेशचा मोबाईल बंद होता. ट्रु कॉलरमध्ये महेशचे नाव आले. एका शेजाऱ्याने महेश बाजूलाच राहात असल्याचे सांगितले होते. 

त्याला घरात घुसून बाहेर काढले... 

पोलिस कर्मचारी किशोर सेनाड आणि प्रवीण आलम हे महेशच्या घरात घुसले. ''खोटी माहिती देऊन पोलिसांना त्रास देतो का?,'' असे म्हणून फटकारले. त्यानंतर दोघांनी त्याला खेचत बाहेर काढले. दोघांनी फरफटत नेऊन त्याला सर्वांसमोर मारहाण केली. गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. महेशचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी पोलिसांची समजूत घातली. त्यानंतर दोघेही पोलिस कर्मचारी परत गेले. 

मनावर परिणाम...

खासगी कंपनीत लेखापाल असलेल्या महेशला नातेवाईक व परिसरातील नागरिकांसमोर पोलिसांनी मारहाण झाल्याने त्याच्या मनावर विपरीत परिणाम झाला. अपमानित झाल्याने महेश याने मध्यरात्री कीटकनाशक प्राशन केले. महेश उलटी करायला लागला. नातेवाइकांनी त्याला मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख