केंद्राकडून राज्याला लसीचा अपुरा पुरवठा; रूग्ण संख्येवर लस देण्याची गरज...  - Insufficient supply of vaccine to the State from the Center; Need to supply vaccine to the number of patients | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्राकडून राज्याला लसीचा अपुरा पुरवठा; रूग्ण संख्येवर लस देण्याची गरज... 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 1 एप्रिल 2021

लसीकरणाचे आकडे पाहिले असता त्याची केंद्र वाढवले आहेत. तेथे अपेक्षित कर्मचारीही वाढवत आहोत. सर्व उपजिल्हा रूग्णलयात लस दिली जाणार आहे. मात्र पर्याप्त प्रमाणात लस उपलब्ध होत नाही, दुसऱ्या लाटेची फटका महाराष्ट्राला बसला आहे. 

कऱ्हाड : केंद्र सरकारकडून राज्याला पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होत नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. राज्याची स्थिती लक्षात घेऊन केंद्राने तो पुरवठा वाढवला पाहिजे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडात दिली. लोकसंख्येच्या प्रमाणात होणारा लस पुरवठा रद्द करून रूग्णांच्या प्रमाणात लस पुरवठा केला यासाठीही पाठपुरवा सुरू आहे, असे श्री. चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. 

श्री. चव्हाण यांनी तालुक्यातील व जिल्ह्यातील कोरोना बाबतच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. श्री. चव्हाण म्हणाले, कोरोनाची स्थिती वाढल्याने शासकीय जुनी कोरोना केंद्र सुरू करत आहोत. अकस्मित कोरोना केंद्राची सध्या गरज नाही. मागील वर्षी एप्रिल ते सप्टेंबर काळात लाट होती. याही वेळी तीच स्थिती आहे. लसीकरणासाठी केंद्र उघडलेली आहेत. कोविडची स्थिती हाताळू शकतो, अशी प्रशासनाची तयारी सुरू आहे. 

तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य कामगार नेमले होते. त्यांना पुन्हा कामावर हजर राहण्याचे आदेश देत आहोत. त्यामुळे कर्मचारी,. बेड, ऑक्सिजन, हॉस्पिटल अशी कोणतीही कमरता यावेळी नाही हे निश्चीत. लसीकरणाचे आकडे पाहिले असता त्याची केंद्र वाढवले आहेत. तेथे अपेक्षित कर्मचारीही वाढवत आहोत. सर्व उपजिल्हा रूग्णलयात लस दिली जाणार आहे. मात्र पर्याप्त प्रमाणात लस उपलब्ध होत नाही, दुसऱ्या लाटेची फटका महाराष्ट्राला बसला आहे. 

केंद्राने जास्तीत जास्त लसीचा पुरवठा केला पाहिजे. लोकसंख्येपेक्षा रूग्णांच्या प्रमाणात लस पुरवठा केला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारचा पाठपुरवा सुरू आहे. लसीकरण वाढवण्यासाठी राज्याच्या हाफकिन कंपनीला भारत बायोटेक्सची कोविडची लस तयार करण्याची परवानगी द्यावी, अशी राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यांना सर्व टेक्नॉलॉजी व रॉमटेरियल द्यावे तसे झाल्यास गतीने लस निर्मिती होऊ शकते. त्यासाठी केंद्राने मान्यता दिलेली नाही. ती मान्यता द्यावी, ही विनंती आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 

सचिन वाझेवरून गंभीर आरोप 

पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या प्रकरणात राज्य सरकारवर गंभीर आरोप झाले आहेत, असे यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले, सरकारवर आरोप गंभीर आहे. त्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही चिंता व्यक्त केली आहे. त्या सगळ्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही गंभीर दखल घेतली आहे. आता ते प्रकरम न्यायप्रविष्ठ आहे. त्याबाबत योग्य निर्णय होईल. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख