साकीनाका येथील घटना दुर्दैवी; त्या क्रूरकर्त्याला देहदंडाची शिक्षा द्या....

ही घटना समस्त मानवजातीला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचे दुःख, खेदही वाटतोच परंतु त्याहीपेक्षा मनस्वी संताप येत आहे.
साकीनाका येथील घटना दुर्दैवी; त्या क्रूरकर्त्याला देहदंडाची शिक्षा द्या....
The incident at Sakinaka is unfortunate; Punish that cruel person with death penalty ....

सातारा : स्त्री दाक्षिण्य मानणा-या माणसाच्या हवसवृत्तीने टोक गाठले आहे. अशा बलात्कारांच्या घटनांना सरकार जबाबदार आहेच. परंतु सर्व समाज आणि मानवजात ही तितकेच जबाबदार आहे. कायदा आंधळा आहे. त्यामुळे जरब बसेल अशा शिक्षांची तरतुद आयपीसी-1860 मध्ये करावी लागेल. तसेच राज्याने बलात्काराच्या बाबतीत कायदेतज्ञांशी विचारविमर्श करुन, वेगळी दंड संहिता अस्तित्वात आणायला हवी. या घटनेची शहानिशा तातडीने करुन, क्रूरकर्त्याला देहदंडाची शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. The incident at Sakinaka is unfortunate; Punish that cruel person with death penalty ....

देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या साकीनाका परिसरातील घडलेल्या घटनेत क्रुरता-विकृती-वासनेला बळी पडलेल्या महिलेची जगण्याची झुंज आज अयशस्वी ठरली. ही घटना समस्त मानवजातीला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचे दुःख, खेदही वाटतोच परंतु त्याहीपेक्षा मनस्वी संताप येत आहे, असे सांगून उदयनराजेंनी म्हटले की, राज्यातील आणि देशातील स्त्री असुरक्षित असेल तर आपण विकासाच्या गप्पा कोणत्या धारणेवर करतो हा प्रश्न पडला आहे. 

स्त्री दाक्षिण्य मानणा-या माणसाच्या हवसवृत्तीने टोक गाठले आहे. या व अशा बलात्कारांच्या घटनेला सरकार तर जबाबदार आहेच. परंतु सर्व समाज आणि मानवजात ही तितकीच जबाबदार आहे. कायदा आंधळा आहे. परंतु तो नेहमीच न्यायिक निवाडा करतो. अशा घटनांना जरब बसेल अशा शिक्षांची तरतुद आयपीसी-1860 मध्ये करावी लागेल. तसेच राज्याने बलात्काराच्या बाबतीत कायदेतज्ञांशी विचारविमर्श करुन, वेगळी दंड संहिता अस्तित्वात आणायला हवी. या घटनेची शहानिशा तातडीने करुन, क्रूरकर्त्याला देहदंडाची शिक्षा झाली पाहिजे, असे ही त्यांनी नमुद केले आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in