मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी साताऱ्यात शिवसेनेच्या ४४८ शाखांचे उद्‌घाटन - Inauguration of 448 branches of Shiv Sena in Satara on Chief Minister's birthday | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी साताऱ्यात शिवसेनेच्या ४४८ शाखांचे उद्‌घाटन

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 28 जुलै 2020

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, आमदार महेश शिंदे व जिल्हाप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तब्बल ४४८ नवीन शांखाचे ऑनलाईन उद्घाटन केले. राज्यातील हा पहिला उपक्रम असून सातारा जिल्हयातील सर्व तालुक्यातील शिवसैनिकांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करीत या उपक्रमाला प्रतिसाद दिला.

सातारा : मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिनी सातारा जिल्हयातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षसंघटना वाढविण्याच्या दृष्टीने एक अनोखी भेट पक्ष प्रमुखांना दिली आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, आमदार महेश शिंदे व जिल्हाप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तब्बल ४४८ नवीन शांखाचे ऑनलाईन उद्घाटन केले. राज्यातील हा पहिला उपक्रम असून सातारा जिल्हयातील सर्व तालुक्यातील शिवसैनिकांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करीत या उपक्रमाला प्रतिसाद दिला.

साताऱ्यातील शिवदौलत शाखेतून जिल्हयातील ४४८ नवीन शाखांचे ऑनलाईन उद्घाटन गृहराज्यमंत्रीशंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थित झाले. यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, संपर्कप्रमुख प्रा.नितीन बानुगडे-पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव उपस्थित होते.

तसेच जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात झुम ॲपव्दारे सर्व उपजिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुख व शिवसैनिक या कार्यक्रमा ऑनलाइनच्या माध्यमातून सहभागी झाले होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपला वाढदिवस सोशल डिस्टसिंग पाळून ऑनलाईन विविध शिबीरे तसेच समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करावा, असे आदेश दिले होते.

त्यानुसार गृहराज्‍यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हयातील विविध तालुक्यांत शिवसेनेची पक्षसंघटना वाढविण्यासाठी गावनिहाय शाखा सुरु करुन त्यांचे ऑनलाईन उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यादृष्टीने झुम ॲपव्दारे जिल्हयातील सर्व उपजिल्हाप्रमुख,पदाधिकारी व शिवसैनिक यांच्याशी संपर्क साधला व तालुकानिहाय शिवसेनेच्या शाखांचे उद्‌घाटन केले. 

मुख्यमंत्र्याकडून उपक्रमाचे कौतुक.

 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दुरध्वनी वरून संपर्क साधला. तसेच शुभेच्छा दिल्यानंतर जिल्हयात पक्ष, संघटना वाढविण्याच्या दृष्टीने ४४८ शाखांचे ऑनलाईन उदघाटन केल्याचे निदर्शनास आणून दिले. या उपक्रमाचे मुख्यमंत्री यांनी कौतुक करुन शिवसैनिकांना धन्यवाद दिले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख