राष्ट्रवादीचा महत्वाचा निर्णय : ओबीसींच्या जागेवर ओबीसीच उमेदवार देणार

राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याची सुचना श्री. पवार केली आहे.
राष्ट्रवादीचा महत्वाचा निर्णय : ओबीसींच्या जागेवर ओबीसीच उमेदवार देणार
Important decision of NCP: OBC will field a candidate in place of OBC

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ओबीसींच्या रिक्त जागांवर ओबीसी उमेदवारच देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान, इंधन व गॅस दरवाढ असे प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहेत. त्यावर कोविड नियमावली पाळून राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका जनतेपुढे मांडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  Important decision of NCP: OBC will field a candidate in place of OBC

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारमध्ये असलेल्या पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, सर्व फ्रंटल सेलचे प्रदेशाध्यक्ष तसेच २०१९ च्या विधानसभेमध्ये निवडणुकीत अल्पशा मताने पराभूत झालेल्या सदस्यांची आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे बैठक घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांना बैठकीनंतर दिली.

हेही वाचा : देशमुखांची विकेट घेण्यासाठी भाजपचे ३६ नगरसेवक नागपूरला रवाना..

या बैठकीत सर्व सदस्यांनी आपल्या स्थानिक भागातील प्रश्न पक्षासमोर मांडले. तसेच पक्षाच्या ध्येय धोरणांवर अनेकांनी आपली मते मांडली. यावर राज्य सरकारच्या माध्यमातून एकत्रितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना दिले असे नवाब मलिक यांनी सांगितले. या बैठकीत चर्चा सुरु असताना राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याची सुचना श्री. पवार केली आहे. 

त्यानुसार तात्काळ पालकमंत्री, संपर्कमंत्री, आमदार यांनी नुकसानीचा पाहणी दौरा करुन उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून सोडविण्यात येणारे प्रश्न निश्चित सोडवले जातील. मात्र, इंधन दरवाढ, गॅसदरवाढ असे प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहेत. त्यावर कोविड नियमावली पाळून पक्षाने आपली भूमिका जनतेपुढे मांडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पक्षाने ओबीसी रिक्त जागांवर ओबीसी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. २०१९ मध्ये ज्या ११४ लोकांना उमेदवारी देण्यात आली होती, त्या सर्व उमेदवारांनी खासदार शरद पवारांसमोर आपले म्हणणे मांडले. साडेपाच तास चाललेल्या या बैठकीत ५५ लोकांनी आपली मते मांडली. त्यांनी राजकीय प्रश्न शिवाय जनतेचे प्रश्न त्यांना कोणत्या प्रकारे मदत देता येईल याबाबतही माहिती दिली. या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील हेमंत नाना देशमुख यांचा पक्षप्रवेश पार पडला. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in